गजबजलेल्या हुतात्मा चौकात बॅरिकेड्स काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:27 AM2021-04-19T04:27:14+5:302021-04-19T04:27:14+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या लक्षात घेता, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाने संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या ...

Demand for removal of barricades in the crowded Hutatma Chowk | गजबजलेल्या हुतात्मा चौकात बॅरिकेड्स काढण्याची मागणी

गजबजलेल्या हुतात्मा चौकात बॅरिकेड्स काढण्याची मागणी

Next

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या लक्षात घेता, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाने संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये व तळोदा तहसीलदार गिरीश वखारे यांच्या मार्गदर्शनात व मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार तळोदा शहरात वर्दळीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता पालिका व पोलीस प्रशासनातर्फे बॅरिकेड्स लावून प्रवेश निषेध करण्यात आला आहे तर काही ठिकाणी मोटार सायकल प्रवेश करेल एवढा रस्ता सोडण्यात आला आहे.. परिणामी काही ठिकाणी रस्ते अरुंद झाले आहे तर काही ठिकाणी रस्तेच बंद झाले आहेत. असाच प्रकार हुतात्मा चौकातील बॅरिकेड्सबाबत झाला आहे. कॉलेज रस्त्यावर सर्वाधिक म्हणजेच पाच ते सहा दवाखाने आहेत. मात्र या रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे दवाखान्यात जाण्यासाठी नागरिकांना फिरून जावे लागत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शिवाय रुग्णाची हेळसांड देखील होत आहे. याबाबत शहरातील युवा नेते संदीप परदेशी यांनी तहसीलदार गिरीश वखारे यांना बॅरिकेड्समुळे दवाखान्यात रुग्ण ने आण करणेकरिता होत असलेल्या अडचणीबाबत कल्पना देऊन सदर समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली होती. याबाबत गिरीश वखारे यांनी देखील पालिका प्रशासनास सूचित केले होते. मात्र याठिकाचे बॅरिकेड्स हटविण्याबाबत टोलवाटोलव करण्यात आली. सदर बॅरिकेड्स न काढल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना गावाला वळसा देऊन तथा गल्लीबोळातून वाहने हाकून ने आण करावी लागत आहे.

सर्वाधिक रहदारीच्या समजला जाणारा हुतात्मा चौक व कॉलेज रस्त्याकडे जाणाऱ्या चौकात मागील आठवड्या भरापासून हे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कॉलेजकडे जाण्यासाठी हा एकमेव असा रस्ता आहे. अचानकपणे झालेल्या या बदलामुळे वाहन चालक चक्रावून जातात. जवळच प्रशासकीय इमारतीकडून जाण्यासाठी रस्ता आहे मात्र तो खूपच अरुंद आहे. शिवाय पोलीस निरीक्षक यांच्या निवासाकडून देखील रस्ता अरुंदच आहे. परिणामी त्या ठिकाणाहून वाहने आल्यानंतर रस्ता ओलांडता येत नाही. त्यामुळे नागरिकांकडून याच रस्त्याचा अधिक वापर होतो.. बॅरिकेडस लावल्यामुळे त्याला प्रतिबंध आला आहे. ते त्वरित काढावे व रस्ता रिकामा करावा. अशी मागणी होत आहे..

कॉलेज रस्त्यावर शहरातील सर्वात जास्त म्हणजेच पाच ते सहा दवाखाने आहेत. हुतात्मा चौकात लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे व कॉलेज रस्त्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे रुग्णांना दवाखान्यात पोहचण्यासाठी गावाला वळसा देऊन जावे लागते. परिणामी अशा परिस्थितीत रुग्णांची हेळसांड होऊन त्यांचा जीव जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. सदर बॅरिकेड्स पूर्णतः काढण्यात यावे अथवा त्या ठिकाणाहून रुग्णवाहिका प्रवेश करू शकेल एवढा मार्ग मोकळा करण्यात यावा....

संदीप परदेशी

काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष

Web Title: Demand for removal of barricades in the crowded Hutatma Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.