शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

अक्कलकुवा शहरात स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

हातपंप लावण्यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा धडगाव : तालुक्यातील १५० च्या जवळपास पाड्यांवर यंदा पाणीटंचाई राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे पाड्यांवर ...

हातपंप लावण्यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा

धडगाव : तालुक्यातील १५० च्या जवळपास पाड्यांवर यंदा पाणीटंचाई राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे पाड्यांवर हातपंप नव्याने लावण्याची मागणी करण्यात आली आहे. जुनाट हातपंप दुरुस्त होणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेने नवीन हातपंप देण्याची गरज आहे.

हायमास्टचा प्रश्न मार्गी लावा

धडगाव : तालुक्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये हायमास्ट आणि पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. संबंधित ठेकेदाराने मंजूर केल्यानंतर सहा महिनेही हे पथदिवे व हायमास्ट पूर्ण क्षमतेने चालू शकले नाहीत, यामुळे त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा नवीन हायमास्ट लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोग्य केेंद्राच्या आवारातील अंधारामुळे सर्पदंशाची भीती आहे.

कोरडी झाडे जैसे थे

नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान कोरड्या झाडांचा प्रश्न कायम आहे. ही झाडे कोसळून अपघात होण्याची भीती आहे. यापूर्वी या झाडांना आगी लावून ती कोरडी करण्यात आली आहेत. ही झाडे प्रशासनाने काढून त्याजागी वृक्षारोपण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लांडग्यांची झुंड

नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील न्याहली ते कोपर्लीपर्यंतच्या वनक्षेत्रातील टेकड्यांवर लांडग्यांचा झुंड फिरताना दिसून येत आहे. या भागात अनेकांची शेती असून शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत वनविभागानेही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.

मिरची पथारींवरील कामे अंतिम टप्प्यात

नंदुरबार : मिरची खरेदी-विक्रीचा हंगाम आटोपता झाला असून शहरातील मिरची पथारींवर व्यापाऱ्यांकडून अंतिम टप्प्यांची कामे सुरू आहेत. सुकवलेली मिरची कारखान्यांमध्ये पाठवण्यासह इतर कामांना सध्या गती देण्यात येत आहे. यंदा मिरची उत्पादन चांगले असले तरी रोग व इतर कारणांमुळे पथारीवर आवक कमी राहिली होती. यातून दर काहीअंशी वाढल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाण्याचा वापर व्हावा

नंदुरबार : तालुक्यातील धरणे व गावतलावांमध्ये अद्यापही मुबलक पाणीसाठा आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. यामुळे जलसंपदा विभागाने धरणातील पाणी द्यावे यासाठी शेतकरी त्या कार्यालयांमध्ये चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.

टरबुजांची आवक

नंदुरबार : ऊन वाढू लागताच बाजारानेही कूस बदलली असून उन्हाळी टरबूज दाखल होऊ लागले आहेत. तालुक्यातील विविध भागात लागवड करून उत्पादित करण्यात आलेल्या या गोड टरबुजांना मागणी आहे. व्यापारी शेतबांधावर जाऊन टरबुजांची खरेदी करत असल्याची माहिती आहे.