जागतिक आरोग्य संघटना केंद्र व राज्य शासनाने महाराष्ट्रात कोरोना विषाणू संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होणे अपेक्षित असल्याने केवळ उपकेंद्रावर लस उपलब्ध नाही. यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग थंडावला आहे. कोरोना विषाणू संक्रमणापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे ही काळाची गरज असल्याने आपण सर्व लसीकरण केंद्रांवर मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, भगवान अलकरी, गणेश चित्रकथे, इद्रिस मेमन, सुरेश मोरे, दिलीप पाटील, रमेश कुवर, प्रकाश तिरमले, मुरली वळवी, प्रकाश शिरसाठ, प्रदीप निकुंबे, धनराज कोळी, लक्ष्मण पवार, लोटन ठाकरे, अनिल मालचे, राजू लोहार यांची नावे आहेत.