आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत अस्वच्छ पाण्यामुळे रोगराई वाढत आहेत. पोटाचे आजार, किडनी स्टोन सारखे आजार पाण्यापासून होत असतात म्हणून प्रत्येकाने फिल्टर पाण्याचा वापर करावा जेणे करून आपले आरोग्य चांगले राहील. शिवाय कोरोना सारख्या भयानक महामारीपासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी गावातील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, प्रेम पाडवी, तंटामुक्त अध्यक्ष परेश पाडवी, पोलीस पाटील अशोक पाडवी, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य भरत पवार, गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे, चेतन गोसावी, संजय ठाकरे, संरपच निर्मलाबाई पाडवी, उपसरपंच गिताबाई पाटील, सदस्य ज्योती चौधरी, सदस्य संदीप वळवी, सदस्य उषाबाई ठाकरे, माजी संरपच प्रविण वळवी, सदस्य मंदा वळवी, सदस्य सुरेश ठाकरे, सदस्य भगवान पाडवी, स्वीय सहायक वीरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, प्रविण वळवी, ग्रामसेवक शेख व आरोग्य सेवक, आशा वर्कर, ग्रामस्थ मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.