पाडामुंड येथे दारुबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 02:24 PM2019-11-17T14:24:39+5:302019-11-17T14:24:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाडामुंड ता.धडगाव या गावात दारूनिर्मिती व विक्री होते त्यामुळे गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. ...

The decision on drunkenness at Padamund | पाडामुंड येथे दारुबंदीचा निर्णय

पाडामुंड येथे दारुबंदीचा निर्णय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाडामुंड ता.धडगाव या गावात दारूनिर्मिती व विक्री होते त्यामुळे गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी गावपंच व दुर्गम युवक समितीच्या पदाधिका:यांच्या प्रमुख उपस्थितीत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.
या सभेत दारूचे दुष्परिणाम व दारू ही संसाराची दुर्दशा या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.  त्यानंतर पोलिस पाटील, सरपंच व धडगांव अक्कलकुवा युवक समितीच्या पदधिका:यांच्या उपस्थितीत एकमताने दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. शिवाय दारू पिणारे व विक्री करणा:यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचा ठरावही करण्यात आला. दारू आदिवासी समाजाच्या विविध कार्यक्रमात लागणारा एक महत्वपूर्ण घटक असला तरी आजपासून दारूऐवजी विविध नैवेद्यांसाठी साखर किंवा तांदूळ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. घरातील महिला व लहान मुलांना दारू पिऊन मारहाण व शिवागीळ करणा:यांवर पाच हजार, ठरावाचे उल्लंघन करीत दारू पिणारे व विकणा:यांवर कायदेशीर कारवाई व त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूबंदीसाठी पाडामुंडच्या विविध पाडय़ांवर प्रत्येकी एक-एक व्यक्तींची कमिटी स्थापन करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील, माकत्या तडवी, सरपंच सुनील तडवी, धडगांव व अक्कलकुवा युवक समितीचे बबन तडवी, अॅड. सिना पराडके, अॅड. सायसिंग वळवी, पत्रकार मंगेश वळवी, प्रा. राकेश वळवी, प्रा. ईश्वर तडवी, शशिकांत वळवी, खेमजी तडवी, कुवरसिंग पराडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: The decision on drunkenness at Padamund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.