लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी कोविड कक्षात उपचार सुरू असताना मृत्यू झाला़ मयताचे स्वॅब घेण्यात आले असून अहवालाची प्रतिक्षा आहे़कर्तव्यावर असलेल्या पोलीस जमादारास बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अत्यवस्थ वाटू लागल्याने पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी तब्ब्येतीची विचारपूस करत पोलीस वाहनातून घरी सोडून दिले होते़ यानंतर जमादारास शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करुन तपासणी करण्यात आली़ होती़ तपासणीनंतर डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याचे सूचित केल्यानंतर तातडीने तेथे रवाना करण्यात आले होते़ याठिकाणी उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे जमादारास श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने कोविड कक्षातील व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते़ मात्र याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला़ दक्षता म्हणून वैद्यकीय पथकाने त्यांचा स्वॅब घेत तपासणीसाठी पाठवून दिला आहे़ त्याचा अहवाल शनिवारी येण्याची शक्यता आहे़मयत पोलीस कर्मचारी धुळे येथे विवाह सोहळ्यासाठी जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे़ मयतावर कोविड नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले़
नंदुरबारात जमादाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:46 IST