लॅाकडाऊनमुळे साधारण व्यावसायिकांना फटका बसत असून लॅाकडाऊन कालावधीमध्ये सरसकट व्यवहार दुपारी १ वाजेपर्यत सुरू करण्याची मागणी हिंदू सेवा समितीचे डॅा. नरेंद्र पाटील यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात मागणीसंदर्भात ३ एप्रिलपर्यत निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली होती. अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र शासनातर्फे निर्णय शिथिल असल्याने डॅा.नरेद्र पाटील यांना ३ एप्रिल रोजी पोलीस प्रशासने उशिरा उपोषणाची परवानगी नाकारल्याने ४ एप्रिल पासून हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी दुपारी १२ वाजेपासून घरासमोरच आमरण उपोषणास बसण्याची तयारी करताना पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी सचिवाद्वारे फोनवरून मुख्यमंत्री याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असून तरी पुढील दोन दिवस उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्याने डॅा.नरेंद्र पाटील यांनी दोन दिवस आमरण उपोषण स्थगित करण्याचे जाहीर केले आहे.
आमरण उपोषण दोन दिवस स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST