अट्टल घरफोडय़ांना एलसीबीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:33 PM2019-11-06T12:33:02+5:302019-11-06T12:33:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकातील चोरी आणि इतर घरफोडी प्रकरणातील दोन चोरटय़ांना स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने अटक ...

Deadline for objections to voter lists today | अट्टल घरफोडय़ांना एलसीबीकडून अटक

अट्टल घरफोडय़ांना एलसीबीकडून अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बसस्थानकातील चोरी आणि इतर घरफोडी प्रकरणातील दोन चोरटय़ांना स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. 
लल्लू उर्फ दिनेश पप्पू तमायचेकर (29) व तानसिंग उर्फ तान्या मोहन अभंगे (27) दोन्ही रा.नंदुरबार असे संशयीतांची नावे आहेत. नंदुरबार बसस्थानकात वाहकाचे पैसे चोरून नेल्याची घटना घडली होती. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे पथक गस्तीवर असतांना त्यांना बसस्थानक परिसरातील बाजार समितीलगतच्या धान्य गोदामाच्या मागे एकजण बसलेला आढळून आला. त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचे नाव लल्लू उर्फ दिनेश तमायचेकर असल्याचे सांगितले. त्याची चौकशी केली असता बसस्थानकातील वाहकाचे पैसे चोरल्याचे सांगितले. शिवाय आपल्यासोबत आणखी एकजण असल्याचीही कबुली त्याने दिली. त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने दुसरा संशयीत तान्या अभंगे हा एमएसईबी कार्यालयाच्या पाठीमागे लपून बसलेला असल्याचे सांगितले. एलसीबीच्या कर्मचा:यांनी लागलीच त्या ठिकाणी धाव घेतली असता काटेरी झुडपात एकजण झोपलेला आढळला. त्याला देखील झडप घालून ताब्यात घेतले असता त्याने तान्या अभंगे असल्याचे सांगितले. शिवाय चोरीची कबुली दिली. 
या दोन्ही संशयीतांवर यापूर्वी देखील घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक भगवान कोळी, पोलीस कर्मचारी राकेश मोरे, पुष्पलता जाधव, मोहन ढमढेरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, किरण मोरे यांच्या पथकाने केली.     
 

Web Title: Deadline for objections to voter lists today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.