शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
2
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
3
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
5
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
6
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
8
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
9
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
11
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
12
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
13
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
14
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
15
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
16
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
17
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
18
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
19
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
20
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

गर्दीमुळे पडू शकते अपयशाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही़ या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनलाही बऱ्याच अंशी प्रतिसाद मिळत आहे़ परंतू निर्धारित वेळेत जीवनाश्वक वस्तू खरेदी साठी होणाºया गर्दीमुळे कोरोनाची ठिगणी पडण्याची शक्यता निर्माण झाली असून गर्दी आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना ओल ठरु लागल्या आहेत़देशात कोरोनाचा संसर्ग थोपवता यावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे़ तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजनांना वेग देत सार्वजनिक जागी गर्दी न करण्याचे आदेश काढत संचारबंदी लागू केली होती़ नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात २२ मार्चपासून संचारबंदी लागू आहे़ या पार्श्वभूमीवर केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच नागरिकांना बाहेर पडण्याचे आदेश आहेत़ या बाजारांमध्येही गर्दी करु नये असे शासनाचे आदेश आहेत़ परंतू सकाळी आठ ते दुपारी १२ यावेळेतच सर्वकाही मिळणार असल्याचा बाऊ करत नागरिक बाजारांमध्ये तोबा गर्दी करत असल्याचे चित्र दुसºया दिवशीही समोर आले आहे़ यात बँकांच्या बाहेरही अशीच गर्दी कायम असल्याने चिंता वाढल्या असून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशांचे पायमल्ली होणे सुरु झाल्याने भाजीपाला बाजाराला आठवड्यातून तीनच दिवस परवानगी द्यावी अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे़नंदुरबार शहरातील नेहरु चौक, हाटदरवाजा, मंगळबाजार, गांधीपुतळा व महाराष्ट्र व्यायाम शाळा या परिसरात किराणा मालाची दुकाने आणि भाजीपाला विक्रीची दुकाने आहेत़ यातून लॉकडाऊन दरम्यान शहरासह शहरालगतच्या गावांमधून नागरिक येथे निर्धारित केलेल्या वेळेत येत आहेत़ परंतू गेल्या दोन दिवसात गर्दीत वाढ झाल्याचे चित्र आहे़ जीवनावश्यवक वस्तूंचा साठा न करता लागेल तेवढेच घेणे बंधनकारक असतानाही वाढीव वस्तूंच्या खरेदीला काही नागरिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे़दरम्यान गर्दी कमी होऊन नागरिकांना भाजीपाला मिळावा यासाठी शहरातील विविध भागात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत़ नियोजित तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर विशिष्ट अंतर ठेवून भाजीपाला विक्री करण्याचे आदेश आहेत़ तसेच शहरातील गिरीविहार, सिंधी कॉलनी, हाटदरवाजा आणि मंगळबाजारातही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यासाठी एखाद्या कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाहेर पडणे अपेक्षित असतानाही गर्दी वाढत असल्याचे प्रशासनाला दिसून आल्याने त्यांच्याकडून गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना सुरु झाल्या आहेत़दरम्यान सोमवारीही जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी नागरिकांसोबत संवाद साधत विविध सूचना केल्या होत्या़ यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शिधापत्रिकाधारक नागरिकांना तीन महिन्याचे रेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुकानदारांनी आॅनलाईन आॅर्डर घेऊन घरपोच सेवा देण्यासारखे उपक्रम राबवावे़ जिल्ह्यात फळे व भाजीपाला वाहतूक सुरळीत रहावी यासाठी आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी बांधवांना शेतमाल बाजारात आणताना अडचण येऊ नये यासाठी त्यांना पास देण्याचे अधिकार मंडळ कृषि अधिकारी यांना देण्यात आले आहेत. यामुळे आवक वाढून बाजारात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूची टंचाई होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असतानाही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी नियमित गर्दी करत असल्याचे चित्र सर्रास नजरेस पडत आहे़शहरातील विविध भागात हातागाड्या आणि चारचाकी वाहनांद्वारे भाजीपाला पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़भाजीपाला बाजारांचे विलगीकरण करण्यासाठी प्रशासन सातत्याने पालिका प्रशासनाच्या संपर्कात असून गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे़शहरी भागात भाजीपाला पुरवठा करणाºया शेतकºयांना वेळोवेळी सूचना करुन शहरातील विविध भागात भाजीपाला पुरवठा करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती असून बुधवारपासून कार्यवाही होईल़