शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

प्रहारतर्फे मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतक:यांवर अस्मानी-सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतक:यांवर अस्मानी-सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला आहे. पंचनाम्यांचे सोपस्कारही पुर्ण करण्यात आले. भरपाई वेळेवर मिळाली तर शेतक:यास रब्बी हंगामाच्या भांडवलासाठी कामात येईल. त्यामुळे सरकसकट 25 हजाराची भरपाईची रक्कम त्वरित द्यावी. या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक शेतक:यांनी एकत्र येत प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी माहिती देतांना जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळात होळपळत आहे. दुष्काळाच्या झळा सोसणा:या शेतक:यांवर यंदा वरूण राजाने मेहर केली. चांगला पाऊस झाला मात्र तो पाऊस हातातोंडातील घास घेऊन जाईल, असे वाटले नव्हते. सर्वत्र शेतकरी समाधानी असतांना पावसाने मात्र कहरच केला. एवढा बरसला की, सर्वत्र जलमय झाले. त्यातून अतिवृष्टीचे संकट उभे राहिले. त्यानंतर काही शेतक:यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतकरी खचला आहे.अस्मानी-सुलतानी संकटाने बेजार झालेले असतांना शेतक:यांचा कोणीही वाली उरला नाही. राज्यात शासन स्थापनेचे सत्तानाटय़ रंगले आहे. त्यातून राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे शेतक:यांचे नुकसानीचे पंचनमे झाले. त्यांना सरसकट 25 हजारांची भरपाई  द्यावी म्हणून गेल्या आठवडय़ात जिल्हाधिका:यांमार्फत निवेदन देण्यात आले होते. भरपाई त्वरित न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र सत्तानाटय़ व राष्ट्रपती राजवट यामुळे शेतक:यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. खरीप हातातून गेलेल्या शेतक:यांना रब्बीची आस आहे. मात्र त्यासाठी हातात पैसा नाही. म्हणून जर नुकसानभरपाईची रक्कम त्वरित दिली तर रब्बीसाठी ती कामात येईल. त्यासाठी त्वरित भरपाईची रक्कम मागणीचे कळविले असताना, शेतक:यांना अद्याप ती मिळाली नाही. म्हणून प्रहार शेतकरी संघटनेतर्फे  ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात बारकू  शिरोळे , मोहन पाटील, प्रमोद दगडू पाटील, सावळीराम करे, गजानन वसावे, उदयसिंग गिरासे, शशिकांत पाटील, प्रभाकर पाटील, सुदाम  वरसाळे, शरद साळवे, ब्रिजलाल धनगर, संजय पाटील, राणूलाल जैन, चपाय राऊत, दिपाल्या वसावे, रामसिग वसावे सहभागी झाले होते.

जिल्ह्यात मनाई आदेश असतांना आंदोलन करू नये अशा सुचना प्रशासनातर्फे आंदोलकांना देण्यात आल्या होत्या. परंतु तरीही संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन देतांना आंदोलकांना पोलिसीन ताब्यात घेतले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. सर्व आंदोलकांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.