वडाळीत न्यायालय आपल्या दारी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:11 PM2019-10-15T13:11:09+5:302019-10-15T13:11:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडाळी :  नागरिकांमध्ये कायदेविषय जागृती निर्माण व्हावी, यासाठी वडाळी ता. शहादा येथे विधी सेवा प्राकिरण व ...

Courts in the Palace Activate Your Door | वडाळीत न्यायालय आपल्या दारी उपक्रम

वडाळीत न्यायालय आपल्या दारी उपक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडाळी :  नागरिकांमध्ये कायदेविषय जागृती निर्माण व्हावी, यासाठी वडाळी ता. शहादा येथे विधी सेवा प्राकिरण व वकील संघामार्फत न्यायालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत लोकन्यायालय घेण्यात आले.
विधी साक्षरता शिबिरातून नागरिकांमध्ये आपल्या हक्कांविषयी ख:या अर्थाने जनजागृती होते, म्हणून राज्यस्तरुनही हा उपक्रम घेण्यात येतो. हा उपक्रम राबवित वडाळी परिसरातील हक्कांची जाणीव करुन देण्याचा प्रय} यावेळी करण्यात आला. याशिवाय लोकन्यायालयही घेण्यात आले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अॅड.भोजेंद्र  शिंदे, अॅड.व्ही. सी. पथारिया, अॅड. व्ही. आर. गोसावी, जे. पी. कुवर, ए. टी. चंद्रात्रे, एम. एच. पाटील, डी. व्ही. सोनवणे, पी. एन. सावंत. जे. बी. अहिरे, शिकील याकूब यांनी परिश्रम घेतले. तर पोलीस पाटील गजेंद्र गोसावी, सरपंच रामू भिल, उपसरपंच हिंमत सोनवणे, ग्राम विकास अधिकारी डी. ए.राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल बागले यांनीही उपस्थिती नोंदवली.
 

Web Title: Courts in the Palace Activate Your Door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.