नवापूर तालुक्यात कोरोना नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:53 PM2020-10-27T12:53:36+5:302020-10-27T12:53:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे नियंत्रण वाढत चालले ...

Corona under control in Navapur taluka | नवापूर तालुक्यात कोरोना नियंत्रणात

नवापूर तालुक्यात कोरोना नियंत्रणात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे नियंत्रण वाढत चालले आहे. तालुका व जिल्हा प्रशासनाची चिंता दूर होत आहे. तालुक्यातून एकूण एक हजार ७८७ रूग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यापैकी नवापूर तालुक्यात आतापर्यंत ५५६ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर ५२२ रूग्ण कोरोना नियंत्रित झाले असून, १९ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे. 
तालुक्यातील कोरोना रिकवरी  रेट ९४ टक्के झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. नागरिकांनी जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत मास्क लावणे, फिजिकल अंतर ठेवणे, बाहेरून घरी आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणे, शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे ही गरजेचे आहे.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोनाचे थैमान सुरू असताना तालुक्यात २२ मार्चच्या लॉकडाऊन नंतर ६२ दिवसांनी नवापूर तालुक्यात विसरवाडी परिसरातील गडदाणी येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. आता केवळ १९ रूग्ण अॅक्टिव आहेत. लवकर नवापूर तालुका संपूर्ण कोरोना नियंत्रित करण्यासाठी तालुका प्रशासन काम करीत आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्याची, राज्याची व देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. ती पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी शासन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती बळकट करावी.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा पोलीस दलामार्फत तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी  माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यशस्वीपणे राबविल्याने नवापूर तालुक्यात कोरोना नियंत्रित होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तोंडाला मास्क न लावणाऱ्या तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस दलामार्फत गुन्हे दाखल करण्यात येणार असून, अशा व्यक्तींना प्रत्येकी दोन हजारपासून ते 200 पर्यंत दंड किंवा पाच दिवसाची कैद, अशी शिक्षा होऊ शकते.  कारवाई टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, नगर पालिका प्रभारी मुख्याधिकारी तृप्ती घोडमिसे, तालुका वैद्यकीय अधिकारी   डॉ.शशिकांत वसावे यांनी केले    आहे.

Web Title: Corona under control in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.