शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

‘कोरोना बराच होतो फक्त रुग्णाने सकारात्मक रहावे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 12:18 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे़ रुग्ण बरे होण्याच्या या टक्केवारीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे़ रुग्ण बरे होण्याच्या या टक्केवारीत डॉक्टर्स, परिचारिका, परिचर यांचा मोठा वाटा आहे़ यातही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बजावलेली सेवा ही वेगळेपण ठरत आहे़ येथे काम करणाºया काही महिला डॉक्टरांसोबत संवाद साधला असता, कोरोना बरा होतो, रुग्णाने केवळ सकारात्मक रहावे असाच सल्ला दिला़महिला डॉक्टरांनी प्रत्यक्ष वॉर्ड, पीपीई कीटमधील वावरणे याबाबत अनुभव कथन करत रुग्ण कसे बरे होवू शकतात हेही पटवून दिले़ चार महिन्यात १४० बेडची सुविधा निर्माण होण्याच्या प्रवासाच्या या डॉक्टर्स आणि परिचारिक साक्षीदार आहेत़ कोरोनाचा सुरूवातीपासून आढावा या महिला डॉक्टर्सने मांडून रुग्णसेवेत वेळोवेळी होत गेलेले बदलही त्यांनी सांगितले़ आजघडीस ९२ परिचारिक आणि १६ महिला वैद्यकीय अधिकारी येथे काम करत आहेत़सात दिवस ड्यूटी आणि सात दिवस क्वारंटाईन राहून घराकडे परतणाºया या हिरकणी पुन्हा कधी परत येणार याचा हिशोब मांडूनच आवारातून बाहेर पडतात हेही त्यांनी शेवटी सांगितले़

  • या संवादादरम्यान डॉ़ वंदना पाटील यांनी अनुभव सांगितला़ ड्यूटीवर असताना रात्रीच्या अडीच वाजता एका ७० वर्षीय रुग्णाची आॅक्सिजन लेव्हल पूर्णपणे खालावून तो गंभीर झाला़ अशा वेळी काय करावे म्हणून त्यांनी वरिष्ठांना कळवले़ परंतु वेळ कमी असल्याने मग त्यांनीच रुग्णाला इंजेक्शन दिले आणि सलाईन लावून उपचार सुरू ठेवले़ दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची प्रकृती सुधारत गेली़ अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून हा रुग्ण बाहेर आला़ अन् चार दिवसात बरा होवून घरीही गेला़ केवळ सकारात्मक विचार ठेवत उपचार दिल्याने हा रुग्ण बरा झाल्याचे डॉ़ पाटील यांनी सांगितले़ हा एकप्रकारे चमत्कार होता असेही त्या म्हणाल्या़

कोरोनाबाधितांना मानसिक आधाराची मोठी गरज असते़ वॉर्डमधील यंत्रांचा आवाज, श्वास घ्यायला होणारा त्रास असलेले रुग्ण अशा वातावरणात काम करणे कठीण असते़ त्यात अंगावर असलेले पीपीई कीट सलग १२ तास घालणे मोठे दिव्यच, परंतु आपल्यात पॉझिटिव्ह ऊर्जा असेल तरच समोरचा बरा होईल या विश्वासाने काम करत राहिले़ कुटूंबापासून लांब राहून ही सेवा देणे अवघड असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने आपण चांगले काम केले असल्याचे समाधान वाटते़-डॉ़ वंदना पाटील, वैद्यकीय अधिकारी, सिव्हील, नंदुरबाऱ

प्रारंभी अडचणी येत होत्या़ कालांतराने सूसूत्रता आली़ आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे़ प्रत्येक बेडपर्यंत परिचारिक व डॉक्टर्स ड्यूटीच्यावेळी सजगपणे लक्ष देत आहेत़ पीपीई कीटमध्ये एप्रिल ते जून पर्यंत येणारा घाम, लागणारी पाण्याची तहान खूप हैराण करणारी होती़ महिलांसाठी हे खूप अडचणीचे होते़ परंतु आता सवय झाली आहे़-डॉ़ रेचेल वळवी, वैद्यकीय अधिकाी, कोविड रुग्णालय, नंदुरबाऱ

तीन वर्षाचा मुलगा घरी कुटूंबासोबत राहत असताना कोविड कक्षात ड्यूटी केली़ १२ तास पीपीई कीट घालून सेवा दिली आहे़ सहा तास आयसीयूमध्ये ड्यूटी करणे अतिशय अवघड़ एखाद्या महिलेने एवढा वेळ पीपीई घालून काम करणे जवळजवळ अशक्यच आहे़ परंतु रुग्णसंख्या अधिक असल्याने रात्र आणि दिवस अशा दोन्ही शिफ्टमध्ये काम केले़ प्रारंभी सगळच नवीन होते़ परंतु डॉ़ वसावे, डॉ़ सातपुते यांच्या मार्गदर्शनात रुग्णांची प्रत्येक बाब बारकाईने समजून घेत उपचार कसा करावा याचीही माहिती घेतली़ यातून खूप काही शिकायला मिळाले़-ड़ॉ़ वर्षा सुळे, वैद्यकीय अधिकारी, सिव्हील, नंदुरबाऱ