मालदा येथे कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:26+5:302021-04-11T04:29:26+5:30

तळोदा तालुक्यातील मालदा गावात सर्दी, ताप खोकला अशी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावातील तरुणांनी कोरोना चाचणी ...

Corona test at Malda | मालदा येथे कोरोना चाचणी

मालदा येथे कोरोना चाचणी

तळोदा तालुक्यातील मालदा गावात सर्दी, ताप खोकला अशी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गावातील तरुणांनी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाच्या पथकास गावात पाचारण केले होते. हे पथक तातडीने गावात दाखल झाले. तरुणांनी ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन कोरोनाविषयी असलेली भीती दूर केली. साहजिकच गावकरीदेखील चाचणीसाठी पुढे आले. जवळपास २०० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ही चाचणी मालदा ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर घेण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने कोरोनाबाबत भीती दूर करून जनजागृती केली. शिवाय शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. उर्वरित लोकांची चाचणी सोमवारी होणार आहे. ही चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे डाॅ. पंकज पावरा, डाॅ. वृक्षाली ठाकरे, आरोग्य सहायक डी. बी. अहिरे, आरोग्यसेवक यू. आर. शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Corona test at Malda