अक्कलकुवा व मोलगी येथे कोरोना रुग्णालय सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:30 IST2021-04-10T04:30:08+5:302021-04-10T04:30:08+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजना कमी पडू ...

Corona Hospitals should be started at Akkalkuwa and Molgi | अक्कलकुवा व मोलगी येथे कोरोना रुग्णालय सुरू करावे

अक्कलकुवा व मोलगी येथे कोरोना रुग्णालय सुरू करावे

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजना कमी पडू लागल्या असल्याने अक्कलकुवा तालुक्यातील रुग्णांसाठी अक्कलकुवा व मोलगी याठिकाणी कोरोना रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली जात आहे. अक्कलकुवा शहरासह तालुक्यातील खापर, वाण्याविहीर, मोलगी परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. येत्या काही दिवसात या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून या तालुक्यातील रुग्णांना योग्य तो उपचार तालुक्याच्या ठिकाणी मिळाल्यास या रुग्णांची होणारी हेळसांड टाळली जाऊ शकते. अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी परिसरातील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांना योग्य उपचारासाठी नंदुरबार येथे जाणे जिकिरीचे होऊन रुग्णाला आपला जीव गमवावा लागेल. तसेच नंदुरबार येथील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये आधीच आरोग्य यंत्रणांना असलेल्या ताणामध्ये वाढ होऊन आरोग्य यंत्रणा कमी पडेल, याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने वेळीच गांभीर्याने लक्ष देत अक्कलकुवा तसेच मोलगी याठिकाणी ऑक्सिजन सुविधायुक्त बेडसह कोरोना रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय सुरू करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची गरज आहे.

Web Title: Corona Hospitals should be started at Akkalkuwa and Molgi