लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाकडून सातवी आर्थिक गणना देशभरात लवकरच राबविण्यात येणार आहे. सातवी आर्थिक गणना कॉमन सव्र्हिस सेंटर ई-गव्हर्नस यांच्याकडून राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी एस.सी. बहिरम यांनी दिलीे. या गणनेसाठी आवश्यक प्रगणक व पर्यवेक्षक यांची नेमणूक कॉमन सव्र्हीस सेंटर ई-गव्हर्नस यांच्याकडून करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटस्तर पर्यवेक्षकांसाठी नुकतेच जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षण वर्गास नागपुर येथील एन.एस.एस.ओ.चे उपमहानिर्देशक ए.डी. पाटील, जळगांव येथील पी.व्ही. पाटील, सुजित सक्सेना, जिल्हा उद्योक केंद्राचे महाव्यवस्थापक सांगळे, जिल्हा नियोजन कार्यालयाचे प्रतिनिधी देशमुख, कॉमन सव्र्हिस सेंटर ई-गव्हर्नसचे जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटील, अमिर पिंजारी, आनंद आगळे उपस्थित होते. या वेळी ए.डी. पाटील यांनी सातवी आर्थिक गणनाबाबत पुर्वपीठीका विशद केली. तसेच पी.व्ही. पाटील यांनी सातवी आर्थिक गणनेतील संकल्पना, व्याख्या याबाबत पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. तसेच कॉमन सव्र्हीस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटील यांनी आर्थिक गणनेचे मोबाईल अॅपद्वारे प्रत्यक्ष काम कसे करावे याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सांख्यिकी सहाय्यक गोरखनाथ लहरे यांनी केले.
आर्थिक गणनेसंदर्भात समन्वय समिती बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:58 IST