नवीन वीज वाहिनी टॉवर उभारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:50 PM2020-02-22T12:50:57+5:302020-02-22T12:51:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील सतोना शिवारात कोसळलेल्या ४०० के.व्ही. वीज वाहिनीचा टॉवर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात ...

Construction of new power tower tower | नवीन वीज वाहिनी टॉवर उभारणी सुरू

नवीन वीज वाहिनी टॉवर उभारणी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील सतोना शिवारात कोसळलेल्या ४०० के.व्ही. वीज वाहिनीचा टॉवर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात झाली आहे. नवीन टॉवर उभारून वीज वाहिनी पूर्ववत करण्याच्या कामाला गती देण्यात आली असल्याची माहिती महापारेषणचे धुळे-नंदुरबार परिक्षेत्राचे देखभाल व दुरुस्ती विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक निन्हाईदे यांनी दिली.
अक्कलकुवा-तळोदा रस्त्यावरील सतोना शिवारात ४०० के.व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचा टॉवर क्र.२९५ हा १३ फेब्रुवारी रोजी दुरुस्तीच्या कामादरम्यान कोसळला. या वीज वाहिनीद्वारे सरदार सरोवर धरणाच्या जलविद्युत प्रकल्पात निर्माण होणारी वीज धुळे जिल्ह्यातील कुंडाणे येथील पॉवर स्टेशनपर्यंत वाहून नेली जाते. तेथून ती वीज धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वितरित होते. हा वीज वाहक टॉवर कोसळल्यामुळे ही वीज वाहिनी खंडित झाली आहे. यामुळे सरदार सरोवर धरणाच्या जलविद्युत प्रकल्पात निर्माण होणारी वीज इतरत्र वळविण्यात आली आहे. असे असले तरी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील वीजपुरवठ्यावर त्याचा कोणताही परिमाण होणार नसल्याची माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.
महापारेषणकडून नवीन टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कार्यकारी अभियंता पी.व्ही. बोंडे, अतिरिक्त सहायक कार्यकारी अभियंता पी.आर. चंद्रे, जे.डी. चोरडिया, मोहंमद सलमान यांच्यासह सुमारे १५० जणांची टीम टॉवर उभारणीच्या कामासाठी कार्यरत आहे.

Web Title: Construction of new power tower tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.