शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

समिती आणि सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र; समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 08:17 IST

आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी आमदारांची समिती अभ्यास दौऱ्यावर धुळ्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : धुळे येथील विश्रामगृहावर आढळलेल्या रकमेशी विधानमंडळ आमदार समितीचा काहीही सबंध नाही. शिवाय समितीतील सदस्यांना देण्यासाठी साडेपाच कोटी रुपये विश्रामगृहात ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांच्या आरोपातही तथ्य नाही, असे सांगत सरकार आणि समितीला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केला.

आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी आमदारांची समिती अभ्यास दौऱ्यावर धुळ्यात आली. या समितीतील आमदारांना देण्यासाठी अधिकारी यांनी साडेपाच कोटी रुपये गोळा केले व विश्रामगृहाच्या  १०२ क्रमांकाच्या रूममध्ये ठेवले आहेत, असा आरोप गोटे यांनी केला. त्याच रूमची तपासणी केली असता त्यात एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आमदार खोतकर यांच्याशी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला असता खोतकर यांनी धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेप्रकरणी करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.

विरोधकांचे समितीला व सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याबाबत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील जप्त करण्यात आलेली रक्कम शिंदेसेनेच्या आमदारांना देण्यासाठीच असल्याचा धक्कादायक आरोप केला. यावर राऊत यांना आरोप करायची जुनी सवय असल्याचे  खोतकर यांनी सांगितले. 

चौकशीअंती गुन्हा 

शासकीय गुलमोहर विश्रामगृहाच्या नं. १०२ मध्ये सापडलेले १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपये जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस विभागातर्फे चौकशी सुरू असून आयकर विभागातर्फे ही स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात सापडलेली रक्कम प्रकरणात सखोल तपास होणे गरजेचे असून, यासाठी नि:पक्षपाती चौकशी समिती स्थापन करून त्यात राज्यातील राहुल रेखावार, तुकाराम मुंढे, प्रवीण गेडाम अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची नेमणूक केली जावी. - अनिल गोटे,  नेते उद्धवसेना

आ.अर्जुन खोतकर आणि त्यांचा पीए यांना तत्काळ अटक करा. कोट्यवधीचे सापडलेले घबाड हा सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. अधिकारी, कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळली गेली अशी चर्चा आहे. - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.

 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकर