लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील ग्रामस्थांनी आपल्या लेकीच्या लग्नानंतर एक वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन आपल्या मुलीसारख्या तिच्या आई-वडिलांनी करायचा संकल्प सुलतानपूर ग्रामस्थांनी केला.सविस्तर वृत्त असे की, सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू आहे. आपल्या मुलीच्या लग्नात कोणत्याही प्रकारची व्यवस्था कमी पडू नये त्यासाठी लाखो रुपये खर्च करून लग्न समारंभ केले जातात. परंतु सुलतानपूर येथील प्रभाकर पाटील यांनी आपल्या भावाच्या मुलीचा सांभाळ करून मुलीचे आई-वडील दोन्हीही आज हयात नाहीत. त्यांनी सर्व लग्नाची जबाबदारी पार पाडून सुलतानपूर या गावी आपल्या मुलीच्या लग्नानंतर जाताना तिच्या नावाचे एक झाड लावून त्या झाडाला जोपासण्याची जबाबदारी घेतली. गावानेही आता आपल्या मुलीच्या लग्नाच्यावेळेस मुलगी सासरी जाताना झाड लावण्याचा संकल्प केला आहे. यावेळी मुलीचे काका प्रभाकर दौलत पाटील, काकू सुनीता पाटील, डॉ.किशोर पाटील, जि.प. सदस्य सुनील चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुलीच्या लगAानंतर वृक्ष लावण्याची सुलतानपूर ग्रामस्थांची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:43 IST