‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:56 AM2020-01-30T10:56:07+5:302020-01-30T11:00:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बहुजन क्रांती मोर्चा व इतर पुरोगामी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

Composite response to 'closed' district | ‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

‘बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बहुजन क्रांती मोर्चा व इतर पुरोगामी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अक्कलकुवा, नवापूर, शहादा येथे बऱ्यापैकी तर नंदुरबार, तळोदा येथे काही भागात बंद पाळण्यात आला. आयोजक संघटनांनी त्या त्या तहसीलदारांना निवेदन दिले. दरम्यान, बंदमुळे जनजिवनावर कुठलाही परिणाम झाला नाही. वाढीव पोलीस बंदोबस्तामुळे शांतता कायम होती.
सीएए व एनआरसी ला विरोध म्हणून बुधवारी विविध संघटनांतर्फे भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला काही संघटनांचा विरोध होता. त्यामुळे वादविवाद होऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू नये म्हणून पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नंदुरबार: सुरळीत व्यवहार
बंदमुळे कुठेही जनजिवनावर परिणाम झाला नाही. अनेक ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू होते. एस.टी.बसेसच्या फेºया नियमित सुरू होत्या. शाळा, महाविद्यालये देखील सुरू होती. नंदुरबारातील मुख्य बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. दरम्यान, नंदुरबारात सकाळी काही युवक बंदचे आवाहन करीत फिरत असतांना पोलिसांनी त्यांना जमावबंदी आदेश लागू असल्याने कायद्याचे पालन केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा देताच जमाव पांगला. पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैणात केला होता. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरिक्षक नंदवाळकर, उपनगरचे भापकर यांनी बंदोबस्त ठेवला होता.
शहादा : बºयापैकी प्रतिसाद
शहाद्यात बहुजन क्रांती मोर्चाच्या सोबत अखिल भारतीय आदिवासी महासंघ, आदिवासी एकता परिषद, भारतीय ट्रायबल पार्टी, एकलव्य आदिवासी युवा संघटना ,भिलिस्तान टाईगर सेना, आदिवासी कोकणी कोकणा समाज संघटना, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, गुरू रवीदास नोकरदार मैत्री संघ, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, इंडियन असोसिएशन, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन, प्रोटॉन, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती मोर्चा, इब्टा शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, जमियात उलेमा हिंद, राजमाता रमाई महिला मंच, आॅल इंडिया मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन, भीम आर्मी, बीएसपी, अखिल भारतीय परिवर्तन संघ या संघटनांनी याबद्दल आपले समर्थन जाहीर केले होते. पोलिसांनी सुरक्षितता म्हणून शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यामुळे बंद शांततेत पार पडला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. राहुल शिंदे, अनिल भाईदास कुवर, कृष्णा जगदेव, अनीस बागवान, इम्रान पठाण, नगरसेवक वसीम तेली, एकलव्य संघटना आणि आदिवासी एकता परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
अक्कलकुवा : कडकडीत बंद
अक्कलकुवा येथे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दिवसभर मुख्य बाजारपेठ, झेंडा चौक, हनुमान चौक, परदेशी गल्ली, बस स्टँड , तळोदा नाका, शिवनेरी चौक, या परिसरातील सर्व दुकाने सुरु होती. व्यवहार सुरळीत सुरु होते, तसेच शहरातील फेमस चौक, व मोलगी चौफुली भागातील काही दुकाने बंद होती. शहराची शांतता भंग होवू नये, कायदा व सुरक्षा पाहता पोलिस प्रशासना तर्फे जागोजागी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत कदम, पोलिस निरीक्षक मेघ:श्याम डांगे, सहायक निरिक्षिक डी.डी.पाटील, रूपाली महाजन यांनी बंदोबस्त ठेवला होता.
तळोदा : परिणाम नाही
तळोदा व परिसरात बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. सर्वत्र सुरळीत व्यवहार सुरू होते. पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त लावला होता. सकाळी भितीपोटी काहींनी दुकानं उघडावी की नाही याचा विचारात असतांना बंदचा फारसा प्रभाव नसल्यामुळे सकाळी १० वाजेनंतर व्यवहार सुरळीत झाले.
नवापूर : बºयापैकी प्रतिसाद
नवापूरातील काही भागात बंदला बºयापैकी प्रतिसाद असल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी बंदोबस्त तैणात होता. यामुळे मात्र जनजिवनावर काहीही परिणाम झाला नाही. एस.टी.च्या फेºया सुरळीत होत्या. याशिवाय मुख्य बाजारपेठ आणि शाळा, महाविद्यालये देखील नियमित सुरू होत्या.


धुळ्यासह राज्यातील काही भागात बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी दुपारनंतर बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर वाढ केली होती. अक्कलकुवा व शहादा येथे विशेष दक्षता घेण्यात येत होती.
बंदचे आयोजक संघटनांना जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश लागू असल्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुणीही मोर्चा किंवा बंदचे आवाहन केले नाही.

Web Title: Composite response to 'closed' district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.