वीर योद्धे महाराणा प्रतापांचे नाव सन्मानाने घेण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 12:49 IST2019-07-14T12:48:41+5:302019-07-14T12:49:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीर योद्धे महाराणा प्रताप यांचा सातवीच्या बालभारती पुस्तकात  एकेरी उल्लेख केला गेल्याने त्यात दुरुस्ती ...

The command of Maharatra Pratap for honoring the name of Maharo Pratap | वीर योद्धे महाराणा प्रतापांचे नाव सन्मानाने घेण्याचे आदेश

वीर योद्धे महाराणा प्रतापांचे नाव सन्मानाने घेण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीर योद्धे महाराणा प्रताप यांचा सातवीच्या बालभारती पुस्तकात  एकेरी उल्लेख केला गेल्याने त्यात दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती़ याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी आदेश काढून  दुरुस्ती करण्याचे सांगितले आह़े 
माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी सर्व माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि विषय शिक्षक यांच्यासाठी आदेश काढून बालभारतीच्या पुस्तकातील पान आठवरील महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख केलेला आह़े याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने पाठय़क्रम शिकवताना महाराणा प्रताप यांचा सन्मानाने वीर असा उल्लेख करण्याचे आदेश काढले आहेत़ जिल्ह्यातील विविध क्षत्रीय राणा राजपूत समाजासह विविध समाज संघटनांनी निवेदन देत याप्रकाराचा निषेध केला होता़ दिग्विजय गिरासे यांनी आपले सरकार पोर्टलवरही तक्रार केली होती़ 

Web Title: The command of Maharatra Pratap for honoring the name of Maharo Pratap