सुजालपूर येथील शिबीरात 46 रक्त पिशव्यांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:53 PM2018-06-17T12:53:01+5:302018-06-17T12:53:01+5:30

Collection of 46 blood bags in Sujalpur camp | सुजालपूर येथील शिबीरात 46 रक्त पिशव्यांचे संकलन

सुजालपूर येथील शिबीरात 46 रक्त पिशव्यांचे संकलन

Next

नंदुरबार : रक्तदानासाठी तरुणांची फळी निर्माण व्हावी, याला लोकचळवळीचे स्वरुप मिळून जिल्ह्यात रक्तदानाचा टक्का वाढावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी                    डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली़  
नंदुरबार तालुक्यातील सुजालपूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होत़े प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष डॉ़ कांतीलाल टाटीया, जेष्ठ पत्रकार रमाकांत पाटील, अण्णासाहेब पी़क़े पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष शितलकुमार पाटील आदी उपस्थित होत़े 
पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी म्हणाले की, जिल्ह्यात रक्तदानाचा टक्का वाढावा यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आह़े वाढते अपघात तसेच वेळ प्रसंगी उद्भवणा:या आपातकालिन परिस्थितीमध्ये रक्ताचे महत्व अनन्यसाधारण असल्याचेही त्यांनी सांगितल़े रक्तदान हे महादान आह़े  जशी चळवळ सुजालपूर येथे निर्माण झाली तशीच चळवळ इतरही गावांमध्ये निर्माण होणे गरजेचे आह़े त्यामुळे सर्वानी रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन डॉ़ कलशेट्टी यांनी केल़े 
दरम्यान, यानिमित्ताने परिसरातील रक्तदान शिबीरात सहभाग घेणा:या ग्रामस्थ तसेच कार्यकत्र्याचा जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ त्यासोबतच झाडे लावा, झाडे जगवा, जलमंदिर, जलसंधारण, नाला खोलीकरण आदी कामात अग्रेसर असलेल्या ग्रामस्थांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात आला़ सदर उपक्रमासाठी सरपंच संतोष भिल, उपसरपंच राजाराम पाटील, प्रवीण पाटील, गोविंद पाटील, स्वप्निल पाटील, सुनील पाटील, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, हेमंत महाराज, सर्व तरुण मित्र मंडळ              यांनी परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला़ रक्तदान शिबीरात एकूण 46 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आल़े रक्त पिशव्यांचे संकलन धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेकडून करण्यात आल़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी  केल़े
 

Web Title: Collection of 46 blood bags in Sujalpur camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.