शहाद्यात दुकानदारांकडून ग्राहकांसाठी आचारसंहिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:16 PM2020-03-27T13:16:23+5:302020-03-27T13:16:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात ...

Code of Conduct for Customers from Shoppers to Martyrs | शहाद्यात दुकानदारांकडून ग्राहकांसाठी आचारसंहिता

शहाद्यात दुकानदारांकडून ग्राहकांसाठी आचारसंहिता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव बघता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री शासनाच्या आखून दिलेल्या वेळेनुसार सुरू आहे. येणाऱ्या ग्राहकांसाठी खबरदारी म्हणून दुकानाबाहेर पट्टे आखण्यात येत आहेत.
जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडणाºया मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला दुकाने आदी ठिकाणी वस्तू घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून त्याठिकाणी कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने कोणतीही गोष्ट घेताना किंवा दोन नागरिकांमध्ये बोलताना थोडे अंतर ठेवून बोलावे, अशी जनजागृती करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहादा शहरातील अनेक दुकानदारांनी स्वत:हून आपल्या दुकानात येणाºया ग्राहकांसाठी दुकानाबाहेर दोन फूट अंतरावर चौकोनी किंवा गोल पट्टे आखून येणाºया ग्राहकांनी आखून दिलेल्या जागेत नंबरने उभे राहावे व दुकानात प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. जो ग्राहक अशा पद्धतीने येणार नाही त्यांना दुकानातून कोणतीही वस्तू देणार नसल्याचे दुकानदारांनी सांगितले.

Web Title: Code of Conduct for Customers from Shoppers to Martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.