तळोदा : तालुक्याच्या ग्रामीण भागासह दुर्गम, अतिदुर्गम भागात स्वछ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या वापराविषयी मोठय़ा प्रमाणावर नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत असून, शौचालय वापराअभावी लाखोंचा निधी पाण्यात गेल्याचे चित्र आहे. तळोदा तालुक्यात सन 2017-18 मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत 6 कोटी कोटी 42 लाख 72 हजार एवढा निधी उपलब्ध झाला होता. त्यातून तालुक्यात पाच हजार 356 शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. प्रशासनाकडून शौचालय बांधणीचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरात शौचालय बांधणीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला असला तरी त्याची उपयुक्तता अत्यल्प प्रमाणात असल्याचे निदर्शनात येते.आजही नागरिक मोठय़ा प्रमाणावर उघडय़ावर शौचास जाताना दिसून येतात. शौचालयाचा वापर करण्याऐवजी हजारो रुपये खचरून उभारण्यात आलेले शौचालयाये ही बंदावस्थेत आहेत तर काही ठिकाणी शौचालयांमध्ये काही तरी साहित्य भरलेले आढळून अनेक शौचालयांचे काम हे अपूर्णा अवस्थेत असून, अनेक शौचालयांच्या टाक्यांचे बांधकामच केले गेले नसल्याची स्थिती आहे. नुसते अनुदान काढण्यासाठी शौचालयास बांधकामपूर्ण दाखवण्यात येते प्रत्यक्षात मात्र शौचालयांचे काम अपूर्ण असते व त्याचा वापर केला जात नसल्याचे ही सांगण्यात येते. त्यामुळे पंचायत समितीकडून सांगण्यात येत असणा:या उद्दिष्टपूर्तीची फलश्रुती असल्याचे फोल ठरत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेबाबत सुधारित धोरण आणि पर्याप्तेच्या माध्यमातून ग्रामीण समाजाला पूर्णपणे सामावून घेण्यासाठी त्यांनी 2 ऑक्टोबर 2014 पासून भारत सरकारच्या वतीने स्वच्छ भारत मिशन राबविण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 र्पयत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्याप्तीची गती वाढवून 2 ऑक्टोबर 2019 र्पयत स्वच्छ भारतचे स्वप्न साकार करणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह हागणदरी मुक्तीच्या कार्यक्रमातील जुन्या उणिवा दूर करुन तो प्रभावीपणे राबविणे, शाश्वत स्वच्छतेच्या साधनांचा प्रसार करणा:या पंचायत राज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जागृती व आरोग्य शिक्षणाव्दारे प्रेरित करणे, पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, ही या अभियानाची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहे. पण तळोदा तालुक्यातील सद्य:स्थिती बघता प्रशासनकडून येत्या वर्षभरात कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.स्वच्छ भारत मिशनचा कालावधी पूर्ण होण्यासाठी आता केवळ आठ ते दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे, असे असताना या अभियानाला अधिक गती देणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत समिती प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधनाची मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शौचालय बांधकाम अनुदानाचा लाभ लाभाथ्र्याना देण्यात येत असताना त्याला शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम असणा:या या योजनेची व उद्दिष्टांची जाणीव करून दिली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रय} होणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन गावागावांमध्ये जावून शौचालय वापराबाबत जनजागृती व प्रबोधन करण्याची गरज आहे. पंचायत समिती प्रशासनाने कागदी उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याऐवजी स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती करुन जनजागृतीपर उपक्रम राबवत तळोदा तालुक्याच्या विविध भागातील नागरिकांना शौचालयांचा वापर करण्यासाठी प्रेरित करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
तळोदा तालुक्यात स्वच्छ भारतचा निधी पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:43 IST