शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट वराहांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील वराहांचा वाढता उपद्रव थांबविण्यासाठी त्यांचा ठोस बंदोबस्त करण्याचे निर्देश तळोदा पालिका, महसूल प्रशासन ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील वराहांचा वाढता उपद्रव थांबविण्यासाठी त्यांचा ठोस बंदोबस्त करण्याचे निर्देश तळोदा पालिका, महसूल प्रशासन आणि पोलिसांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे या तिन्ही यंत्रणा वराह पालकांवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. कारण वराहांच्या उपद्रवामुळे सर्वच नागरिक अक्षरश: वैतागले आहेत.शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात कोरोना या घातक महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केलेत. त्यामुळे आता पावेतो तरी तळोद्यात कोरोनाला प्रतिबंध घालण्यात मोठे यश आले आहे. तरीही पावसाळ्यात कोरोना बरोबरच इतर साथींच्या फैलावाची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाकडून आतापासूनच कडक उपायय योजना आखण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधीत यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सलग दोन दिवस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. याशिवाय तळोदा शहर सुंदर, स्वच्छ करण्याचा उपक्रमदेखील वरिष्ठ महसूल प्रशासनाने हाती घेतला आहे. त्यातही शहरात वराहांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अस्वच्छताही वाढली असल्याचे ही चित्र आहे.शहरातील नागरिकांनादेखील त्यांच्या उपद्रवाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचे नागरिक सांगतात. कारण वराहांच्या झुंडीमुळे शहरातील एका ज्येष्ठ नागरिकास जीव सुद्धा गमवावा लागल्याची घटना घडली आहे. निदान उपविभागीय अधिकाºयांनी तरी उपद्रवी वराहांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार केला आहे. कारण त्यांनी सलग दोन्ही बैठकांमध्ये याबाबत कडक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. एवढेच नव्हे त्याबाबत वराह पालकांची बैठक घेऊन समज देण्याची सूचना सुद्धा त्यांनी प्रशासनास दिली आहे. यापूर्वी नगर पालिकेने वराहांच्या बंदोबस्ताबाबत अनेक वेळा वराह पालकांना नोटीसा बजाविल्या होत्या. तरी ही बंदोबस्त केला नाही तर पोलिसात कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. परंतु तेवढ्या पुरता वराह पालकांनी आपले वराह इतरत्र नेल्याचा देखावा केला. त्यानंतर पालिकेनेही याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा आपले वराह शहरात सोडले आहे. त्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात फिरत आहेत. अचानक रस्त्यावर कुठेही पळत सुटत असतात. हे वराह रस्त्यावर अनेक वेळा मोटारसायकलींना आडवे जात असल्यामुळे मोटारसायकलस्वार जायबंदी झाल्याच्या घटना घडत असतात. वराह पालकांवर ठोस कारवाई होत नसल्यामुळे तळोदेकरांना त्याचा जाच सहन करावा लागत असल्याचे काही शहरवासीयांनी बोलून दाखविले आहे. परंतु आता उपविभागीय अधिकाºयांनी वराहांचा वाढता उपद्रव थांबविण्यासाठी नगरपालिका, महसूल प्रशासन व पोलीस ठाणे अशा तिन्ही यंत्रणांना बंदोबस्ताबाबत कडक निर्देश दिले आहेत. साहजिकच शहरवासीयांच्या आशादेखील पल्लवीत झाल्या आहेत. विशेष म्हणजे वराहांच्या शहरानजिकच्या, आसपासच्या शेतांनादेखील मोठा फटका बसत असतो. पिकांचे नुकसान करीत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात यापूर्वी करण्यात आल्या आहेत. आता या तिन्ही यंत्रणा वराह पालकांवर काय कारवाई करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या’सारखी गत होऊ नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.वराहांप्रमाणेच शहरात फिरणाºया मोकाट गुरांचाही बंदोबस्त करण्यासाठी महसूल प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी तमाम नागरिकांची माफक अपेक्षा आहे. अशा मोकाट फिरणाºया गुरांच्या पालकांवर जो पावेतो कडक कारवाई होणार नाही तो पावेतो मोकाट फिरणाºया गुरांचीही संख्या कमी होणार नाही. या गुरांचा जास्त वावर बसस्थानक रस्त्यावरच अधिक दिसून येत असतो. ही गुरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्यामुळे सर्वच वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असतो. कधी-कधी ते रस्त्यावरून उठत नसल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. या रस्त्यावर भाजीपाल्याच्या लॉºया लावणाºया भाजी विक्रेते रस्त्यावरच सायंकाळी भाजी फेकतात. त्यामुळे येथेच मोकाट गुरांचीही गर्दी असते. वास्तविक नगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई करून कोंदवाड्यात डांबणे अपेक्षित आहे. परंतु कारवाईच केली जात नसल्याने या पशुपालकांचे चांगलेच फावले आहे. एवढेच नव्हे ही मोकाट गुरे रात्रंदिवस रस्त्यावरच मोकाट फिरत असतात. पालिकेकडे बंदोबस्ताबाबत सातत्याने मागणी करून थकलेल्या त्रस्त नागरिकांना आता वरिष्ठ महसूल प्रशासनाकडून आशा आहे. त्यांनीच याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी आहे.तळोदा शहरातील वराहांचा बंदोबस्त करण्यासाठी उपविभागीय अधिकाºयांनी सूचित केले आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत वराह मालकांची मिटींग घेऊन त्यांना समज देण्यात येणार आहे. या उपरांतही त्यांनी कार्यवाही केली नाही तर कायदेशीर नोटीसा बजाविण्यात येतील.-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका, तळोदा