प्रवासाचा ई-पास मिळवण्यासाठी नागरिक वापरताहेत विविध ‘फंडे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 01:13 PM2020-08-07T13:13:43+5:302020-08-07T13:13:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाहेरगावी प्रवास करता यावा यासाठी नागरिकांना ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे़ यात वैद्यकीय कारणासाठी ...

Citizens use various 'funds' to get travel e-pass | प्रवासाचा ई-पास मिळवण्यासाठी नागरिक वापरताहेत विविध ‘फंडे’

प्रवासाचा ई-पास मिळवण्यासाठी नागरिक वापरताहेत विविध ‘फंडे’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाहेरगावी प्रवास करता यावा यासाठी नागरिकांना ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे़ यात वैद्यकीय कारणासाठी प्रवास करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य असून इतर कारणांना दु्य्यम स्थान देण्यात येत आहे़ परंतु या दुय्यम स्थानातील कारणांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पास मिळावा यासाठी विविध कारणे दिली जात आहेत़
जिल्हाधिकारी कार्यालयांकडून आजअखेरीस ३८ हजार ५८१ जणांना ई-पास देऊन बाहेरगावी जाण्याचा परवाना देण्यात आला आहे़ तर ९ हजार ५७१ जणांचे अर्ज ठोस कारण नसल्याने नाकारण्यात आले आहेत़ वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आधारकार्ड असे दोनच कागदपत्रे आॅनलाईन अपलोड करण्याची सोय आहे़ प्रामुख्याने वैद्यकीय तपासणी, शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी जाणाºया नागरिकांना तातडीने ई-पास दिला जात आहे़ परंतू मुलासाठी मुलगी पाहवयास जाण्याचा कार्यक्रम, छोट्या स्वरूपात विवाह, साखरपुडा, नोकरी, व्यवसायानिमित्त रक्कम वसुली, शैक्षणिक कामे, नातेवाईक मयत झाल्यास भेटी यासह विविध कारणे देत नागरिक ई-पासची मागणी करत आहेत़ यात केवळ विवाह सोहळा हा एकच ठोस कार्यक्रम पुराव्यासह देता येतो़ यातून काही जण विवाह सोहळ्यांच्या नावाने पत्रिका तयार करुन प्रवास करत आहेत़ परजिल्ह्यात कागदपत्र पडताळणी वेळी या पत्रिका दाखवून वेळ मारुन नेण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहे़ शैक्षणिक कामांसाठी जाणाºयांना केवळ विद्यापीठ किंवा शिक्षण मंडळाच्या कामांसाठी परवाने दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे़
वैद्यकीय कारण असल्यास तातडीने परवाना देण्यात येत असल्याने अनेकांनी बाहेरगावी तपासणी केलेल्या जुन्या फाईल्स काढून त्या प्रमाणपत्र म्हणून रिसबमिट करत परवाने मिळवल्याचेही समोर आले आहे़ तपासणीच्या नावाने गावी जात असल्याचे त्यांनी नमूदही केले होते़ शासनाने ई-पाससाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर आधार कार्ड आणि वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करण्याचीच सोय केली आहे़ यातून मग इतर कारणांनी प्रवास परवाने मिळवणे अडचणीचे होत असल्याचे दिसून आले आहे़ शासनाने संकेतस्थळावर तसा बदल करण्याची गरज आहे़

Web Title: Citizens use various 'funds' to get travel e-pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.