सातपुड्यातील ‘निरा’ला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:27 PM2019-12-15T12:27:05+5:302019-12-15T12:27:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुर्वेदिक पेय म्हणून अवलंबले जाणाऱ्या ‘निरा’ उत्पादनास खरे तर वसंत ऋतूमध्ये सातपुड्यात सुरुवात होत ...

The choice of 'Nara' in Satpuda | सातपुड्यातील ‘निरा’ला पसंती

सातपुड्यातील ‘निरा’ला पसंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आयुर्वेदिक पेय म्हणून अवलंबले जाणाऱ्या ‘निरा’ उत्पादनास खरे तर वसंत ऋतूमध्ये सातपुड्यात सुरुवात होत असते. परंतु नोव्हेंबरमध्येच निरा देण्यारी काही ताडाची झाडे आहे. ही झाडे धडगाव तालुक्यातील कुंडल, खडक्या, सोन व भानोली या गावांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना या झाडांपासून मिळणारी निरा आयुर्वेदिक औषध म्हणून उपलब्ध होणार आहे.
ताडी व निरा असे एकदाच दुहेरी उत्पादन देणारे शिवाय अनेक दुर्धर व किरकोळ आजारांवर उपायकारक आयुर्वेदिक फळे देणारे ताडाचे झाडे सातपुडा व विंध्य पर्वतात मुबलक प्रमाणात आढळून येत आहे. या झाडांना वसंत ऋतूत हातापेक्षा मोठ्या कळ्या येतात. त्या कळींना ताडी व निरा उत्पादनासाठी घडविले जातात, त्यानंतर उत्पन्नाला सुरुवात होते. असे असले तरी धडगाव तालुक्यातील काही झाडे नोव्हेंबरमध्येच उत्पादन देणारे देखील आहेत. या झाडांना हेमंत ऋतूतच कळी फुटल्या असल्याने नोव्हेंबर महिन्यात उत्पादनालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे निराच्या माध्यमातून आरोग्याला गुणकारी व अनेक आजारांवर उपायकारक ठरणारे आयुर्वेदिक पेय उपलब्ध होणार आहे.
सातपुड्यात प्रामुख्याने धडगाव तालुक्यातील खरवड, सोन, भानोली, हरणखुरी, खडक्या, कुंडल व कात्री तर अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी, चनवाई, ओलपाडा या गावांमध्ये ताडाचे झाडे आढळून येत आहे. झाडाला फुटलेल्या कळ्यांमधूनच हे पेय निघत असून ते साठविण्यासाठी भांडे टांगावे लागते. एकदा सुरुवात झाल्यानंतर निरा उत्पादकाला रोज सकाळ-संध्याकाळ झाडावर चढावे लागते. अपेक्षेनुसार चांगले उत्पादन मिळविण्यासाठी त्यांना घडवलेली कळी वेफर्सच्या आकाराचा भाग रोज दोन्ही वेळेस कापावा लागत आहे. रात्रभर साठवली जाणारे पेय हे निरा तर दिवसा साठवलेले पेय हे ताडी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आव-निवडीनुसार अवलंब होत आहे.

ताडाच्या झाडापासून मिळणारे पेयाला उन्हाचा स्पर्श झाल्यास ते ताडी बनते. ही ताडी प्राशन केल्यास त्यातून आयुर्वेदिक गुण तर मिळतातच परंतु त्यापासून नशाही येते. तर थंड वातावरणात राहिलेले पेय हे निरा ठरत असते. त्यामुळे रोज रात्री साठवलेले तथा सकाळी झाडावरुन उतरवलेले पेय हे निरा असून या निराचा नैसर्गिक गोडवा हा सर्वाधिक असतो. निरा क्षमतेपेक्षा अधिक प्राशन केल्यास त्या-त्या व्यक्तींना हगवण देखील जडते. इतका या निराचा गोडवा राहत असतो. त्यामुळे तेथील प्रत्येक जाणकार व्यक्तींकडून निरा ही मर्यादितच घेत आहे. कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या निरामुळे कदाचित प्राशन करणाऱ्यांना काहीही होत नसावे, असे अंदाज निरा उत्पादकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

फळासाठी निरा-ताडीचे उत्पादन टाळले जाते
ज्या निरा उत्पादकाला ताडाचे फळ हवे असेल त्या-त्या कळीपासून मिळणारी निरा व ताडीला मुकावे लागते. ताडाचे फळ देखील आयुर्वेदिक असून त्याच्या गर सेवन करण्याची पारंपरिक पद्धत आहे. कोवळ्या फळात निघणारा गर हा लुसलुशित असून तो खोबºयापेक्षाही अधिक गोड व चवदार असतो. फळ कडक तथा परिपक्वझाल्यास त्यातील गर सेवन करण्यास जड जात असतो. त्यामुळे सहसा कोवळ्या फळातीलच गर सेवन करण्यास प्रधान्य दिला जातो. परिपक्व झालेले फळ हे पिकल्यानंतर त्यांचा आंब्याच्या कोठाराप्रमाणे सुगंध येतो.

Web Title: The choice of 'Nara' in Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.