भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांपुढे विधानसभा निवडणुकांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:17 PM2019-06-24T12:17:47+5:302019-06-24T12:17:52+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा   निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने संघटनात्मक बदल करून जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी ...

Challenge of assembly elections to BJP's new district president | भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांपुढे विधानसभा निवडणुकांचे आव्हान

भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांपुढे विधानसभा निवडणुकांचे आव्हान

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा  
निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने संघटनात्मक बदल करून जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे जुन्या भाजप कार्यकत्र्याकडून स्वागत होत असले तरी जिल्ह्यात भाजपमधील बडय़ा नेत्यांमधील वाद चव्हाटय़ावर गेल्याने त्यांच्यात समन्वय राखून विधानसभेचे यश मिळविण्याची कसरत नव्या अध्यक्षांना करावी लागणार आहे, नव्हे तर ते एक आव्हानच ठरणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या  2014 च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते डॉ.विजयकुमार गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय चित्रच तेव्हापासून बदलले आहे. 40 वर्षानंतर प्रथमच या भागात भाजपचे खासदार झाले तर एरवी विधानसभेत जेमतेम एक आमदार असणा:या जिल्ह्यात दोन आमदार मिळाले आहेत. भाजपची शक्ती जिल्ह्यात वाढली असली तरी डॉ.गावीतांच्या प्रवेशानंतर भाजपतील जुने कार्यकर्ते आणि डॉ.गावीत समर्थक नवे कार्यकर्ते यांच्यातील वाद कायम राहिला आहे. अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते वाद पहायला मिळाले. हे वाद या वेळी इतक्या चव्हाटय़ावर गेले होते की पक्षाने डॉ.हीना गावीत यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही त्यांची उमेदवारी बदलण्यासाठी जिल्ह्यातील नाराज भाजपचे कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींर्पयत पोहोचले होते. त्यातून बंडखोरीही झाली. पण बंडखोरांना समर्थन मिळू नये यासाठी पक्षश्रेष्ठींनी अधिक दक्षता घेतल्याने बंडखोरीचे राजकारण भाजपला डोईजड ठरले नाही. डॉ.हीना गावीत यांना पुन्हा दुस:यांदा विजयी करण्यात भाजपला यश आले.
या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून ते चित्र डोळ्यासमोर ठेवूनच जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी खासदार डॉ.हीना गावीत ह्या जिल्हाध्यक्षा होत्या. आता त्यांच्याजागी भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. तर डॉ.हीना गावीत यांची भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील जुन्या भाजपच्या कार्यकत्र्याना आनंद झाला असून नियुक्तीनंतर त्यांनी तो व्यक्तही केला आहे.
एकूणच जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी थांबल्याने संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. डॉ.हीना गावीत यांनी जी बांधणी केली ते त्यांचे समर्थक होते, असा आरोप लावला जातो. त्यांनी जुन्या कार्यकत्र्याना न्याय दिला नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर डॉ.गावीत यांच्यामुळेच भाजपची ताकद जिल्ह्यात वाढल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.
या वादाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाध्यक्षपदाची धुरा विजय चौधरी यांच्यावर पक्षाने सोपवली आहे. चौधरी हे मूळ संघ आणि शिवसेनेच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते. सुरुवातीला ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर काही काळ ते राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष होते. पण संघाच्या विचारसरणीमुळे राष्ट्रवादीत ते जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या कार्याला दाद देत पक्षाने  त्यांना नव्यानेच स्थापन झालेल्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. तीन वर्षाच्या काळात त्यांनी ओबीसी मोर्चाचीही राज्यात चांगली बांधणी केली. त्याचीच दखल घेत जिल्ह्यातील विस्कळीत झालेली पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
विधानसभा निवडणुका तीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपतील कार्यकत्र्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर चलबिचल सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी नवे इच्छुक तयार होत आहेत. पक्षांतर्गत वाद आज जरी समोर येत नसले तरी जुने वाद कायम असल्याने नेत्यांमधील मतभेद उघड आहेत. पक्षाचे डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी हे दोन आमदार असले तरी दोघांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील समन्वय राखून पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे नव्या अध्यक्षांपुढे आव्हान राहणार आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीसाठी शहादा-तळोदा मतदारसंघातून दोन नवे इच्छुक तयार झाले आहेत. अक्कलकुव्यातही अनेक इच्छुक आहेत. नवापुरात पक्षापुढे मोठे आव्हान आहे. नंदुरबारात स्वत: डॉ.विजयकुमार गावीत यांचा मतदारसंघ असल्याने येथेदेखील  जुन्या कार्यकत्र्याची धुसफूस रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. केंद्रात आणि राज्यातही     सत्ता असल्याने पक्षाची चलती  असली तरी कार्यकत्र्यामधील    अंतर्गत मतभेद प्रचंड आहेत. सत्तेची इर्षाही अनेक कार्यकत्र्याना लागली आहे. अशा स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणे नवे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासमोर आव्हानच ठरणार आहे.

Web Title: Challenge of assembly elections to BJP's new district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.