कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोपान बोराटे, तर प्रमुख वक्ते म्हणून क्युरेटर इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळ धुळे येथील श्रीपाद माधव नांदेडकर उपस्थित होते. नांदेडकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय दुर्मीळ आणि उल्लेखनीय माहिती सहभागी प्राध्यापक तसेच विद्यार्थिनींना दिली. प्रास्ताविक प्रा. डॉ. कैलास चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मंगला चौधरी यांनी केले. आभार प्रा. योगेश भुसारे यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी प्रा. मंगला चौधरी, प्रा. के. जे. अनपट, प्रा. योगेश भुसारे, प्रा. खेमराज पाटील, प्रा. डॉ. जयेश गाळणकर, प्रा. रेणुका पाटील, प्रा. मंगला पाटील, प्रा. रवींद्र खेडकर, प्रा. दीपिका पटेल व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.