वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांसाठी गेल्या वर्षी तालुक्यातील मोड जवळ वसाहत स्थापन करण्यात आली आह़े साधारणत: 35 कुटुंबांचे तेथे स्थलांतर करण्यात आले आह़े त्यापैकी 11 कुटुंबाना संबंधित यंत्रणेने अजूनही छतावरील कौले पुरवलेली नाहीत़ त्यामुळे 42 अंशाच्या तापमानात संबंधित कुटुंबिय उघडय़ावर राहत आहेत़ नुतन जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करुन त्यांना कौले पुरवावीत अन् बेजबाबदार अधिका:यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा अशी मागणी विस्थापितांकडून करण्यात येत आह़े सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या नर्मदाकाठावरील 134 कुटुंबाचे तळोदा तालुक्यातील मोड जवळील वसाहतीत स्थलांतर करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आह़े गेल्या वर्षी चिमळखेडी, उलेल, धनखेडी, सिंदूरी, गमन येथील 35 कुटुंबाना तेथे आणण्यात आले आह़े प्रशासनाने त्यांच्या घराचे संपूर्ण साहित्य स्थलांतरीत वसाहतीत आणले आह़े तथापि त्यातील अकरा कुटुंबाना अजूनही घराच्या छतावर टाकण्यासाठी कौले दिलेली नाहीत़ त्यामुळे या कुटुंबियांची मोठी गैरसोय होतेय़ त्याच बरोबर संपूर्ण वसाहतीत वीजखांब, तारा ओढून, ट्रान्सफार्मरदेखील बसविण्यात आला आह़े परंतु जोडणीअभावी बाधितांना अंधारातच रहावे लागत आह़े वास्तविक नर्मदा अवार्ड प्रमाणे प्रकल्पातून स्थलातरीत करण्यात आलेल्या वसाहतींमधील विस्थापितांना सर्वच पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित नर्मदा विकास व सरदार सरोवर विभागाची आह़े मात्र सदर यंत्रणांनी याबाबत उदासिन भुमिका घेतल्याचा आरोप आह़ेवसाहत धारकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी नर्मदा विकास विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत तीन हातपंप करुन देण्यात आले आहेत़ त्यापैकी एकच हातपंप सुरु आहेत, तर उर्वरीत दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहेत़ तेथील कुटुंबाना एकच हात पंपाच्या आधार घ्यावा लागत आह़े तोही पाणी खोलवर गेल्यामुळे कमीत कमी पाणी निघत असत़े वास्तविक नादुरुस्त हातपंप दुरुस्ती करण्याची आवश्यकता असताना संबंधित यंत्रणा तेवढीही तसदी घ्यायला तयार नाही़ या शिवाय वसाहतीत पाण्याची टाकी बसविण्यात आली आह़े मात्र बाधितांना नळजोडणी करण्यात आलेली नाही़ सरदार सरोवर प्रकल्प व नर्मदा विकास विभाग या दोन्ही यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच प्रकल्पग्रस्तांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप आह़े
कौलांअभावी प्रकल्प बाधित करताय तीव्र उन्हाचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:51 IST