आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.६ : तालुक्यातील आष्टे ते नंदुरबार दरम्यान चारचाकी-बसची समोरसमोर धडक होऊन कारचालक ठार झाला़ ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़नंदुरबार-आष्टे दरम्यान ओझर्दे फाट्याजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास नंदुरबारकडून नाशिककडे जाणाºया एमएच १४ बीटी २१२८ या बसने समोरून येणाºया एमएच ३९ जे १३२६ या कारला धडक दिली़ भरधाव वेगात दोन्ही वाहने एकमेकांवर आदळल्याने कारचालक ऋषीकेश रवींद्र जमदाडे रा़ खोंडामळी जागीच ठार झाला़ कारचालक जमदाडे हा गाडीमालक एऩडी़नांद्रे यांना छडवेल ता़ साक्री येथे सोडून नंदुरबारकडे येत होता़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर आष्टे व नंदुरबार शहरातील काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ पोलिसांकडून उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात येत होती़बसमधील काही प्रवाशांना अपघातामुळे दुखापत झाल्याची माहिती आहे़ पाऊस सुरू असल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काहीवेळासाठी ठप्प झाली होती़
आष्टेजवळ बस-कारच्या धडकेत चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:16 IST
भरधाव वेगाने असणारी दोन्ही वाहने आदळली एकमेकांवर
आष्टेजवळ बस-कारच्या धडकेत चालक ठार
ठळक मुद्देकारचालक ऋषीकेश रवींद्र जमदाडे रा़ खोंडामळी जागीच ठारआष्टे व नंदुरबार शहरातील नागरिकांची घटनास्थळाकडे धावबसमधील काही प्रवाशांना अपघातामुळे दुखापत