शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

किलबिलाटाविना ओस पडला सलसाडी आश्रमशाळेचा परिसर

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: August 31, 2018 18:36 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी उशीरार्पयत आश्रमशाळा परिसरात सुरू राहणारा विद्याथ्र्याचा किलबिलाट तीन दिवसांपासून सुनासुना झाला आहे. जेथे विद्याथ्र्याचा राबता होता तेथे केवळ कर्मचारी आणि बंदोबस्ताला असलेले पोलीस नजेरस पडत आहेत. गावकरीही घडलेल्या घटनेमुळे गावाची बदनामी झाल्याच्या भावनेने खिन्न झाले आहेत. हे चित्र आहे सलसाडी, ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी उशीरार्पयत आश्रमशाळा परिसरात सुरू राहणारा विद्याथ्र्याचा किलबिलाट तीन दिवसांपासून सुनासुना झाला आहे. जेथे विद्याथ्र्याचा राबता होता तेथे केवळ कर्मचारी आणि बंदोबस्ताला असलेले पोलीस नजेरस पडत आहेत. गावकरीही घडलेल्या घटनेमुळे गावाची बदनामी झाल्याच्या भावनेने खिन्न झाले आहेत. हे चित्र आहे सलसाडी, ता. तळोदा येथील शासकीय आश्रम शाळेचे. सोमवार, 27 रोजी सकाळी विजेचा शॉक लागून विद्याथ्र्याचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर जमावाकडून प्रकल्प अधिका:यांसह वरिष्ठ अधिकारी, पोलीस व शिक्षकांना झालेली मारहाणीची घटना राज्यभर गाजली. घटनेनंतर शाळेतील सर्वच 413 विद्याथ्र्याना पालक घरी घेवून गेले आहेत. आज  चार दिवस झाले तरी शाळेत विद्यार्थी फिरकत नाहीत. शिक्षकांसह इतर कर्मचा:यांच्या मनावर भितीचे सावट आहे. गावक:यांचा घटनेत सहभाग नसला तरी बाहेरच्या लोकांनी येवून घातलेल्या धुडगूसमुळे गावाची झालेली बदनामीची सल त्यांच्या चेह:यावर आहे. सलसाडी, ता.तळोदा येथील आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता सहावीतील सचिन चंद्रसिंग मोरे (11) रा़ गढीकोठडा ता़ तळोदा या विद्याथ्र्याचा कुपनलिकेची मोटर सुरू करतांना विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने शाळेतील शिक्षक, कर्मचा:यांना आधी मारहाण केली. त्यानंतर घटनेची पहाणीसाठी आलेल्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना बेदम मारहाण केली. पोलिसांना देखील जमावाने सोडले नाही. या घटनेनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. राज्य शासकीय कर्मचा:यांनी एक दिवस बंद पुकारला. आता पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू असली तरी या घटनेमुळे शाळा ओस पडली आहे. 1972 साली सुरू झाली शाळासलसाडी गावात आश्रमशाळा सुरू व्हावी यासाठी गावक:यांनी जंग जंग पछाडले होते. अखेर शाळा मंजुर झाली. आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शाळा मान्यता मिळाली. शाळेच्या इमारतीसाठी गावकरी राबले. विटा पाडणे, माती आणने यासह इतर अनेक कामे करून गावक:यांनी इमारत उभी केल्याची आठवण गावातील ज्येष्ठ नागरिक काशिनाथ खात्र्या ठाकरे सांगत होते. या मागचा उद्देश एकच गावातील, परिसरातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे.. त्यानंतर 1983 साली शाळा आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत गेली. आजही  जुन्याच इमारतीत शाळा आणि विद्यार्थी, विद्यार्थीनींची राहण्याची सोय आहे. अनेक असुविधांना सामोरे जात येथे 413 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.नवीन इमारत तयारआदिवासी प्रकल्प विभागाने येथे नवीन इमारतीचे बांधकाम केले आहे. अत्याधुनिक इमारत उभी आहे. मे महिन्यातच ठेकेदाराने इमारतीचे काम पुर्ण करून ती ताब्यात दिली आहे. केवळ अंतर्गत वीज कनेक्शनअभावी नवीन इमारतीत शाळा सुरू झालेली नाही, विद्यार्थी राहण्यास गेलेले नसल्याची स्थिती आहे. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच अर्थात जून महिन्यातच नवीन इमारतीत राहण्याची आणि शिक्षणाची सोय झाली असती तर परवाची घटना टळली असती असे गावकरी सांगत आहेत. शुकशुकाट आणि भयग्रस्त चेहरेगुरुवारी सकाळी शाळेला भेट दिली असता आश्रमशाळा परिसरात शुकशुकाट होता. जेथे दिवसभर विद्याथ्र्याचा किलबिलाट होता तेथे शुकशुकाट आहे. आश्रमशाळा कर्मचा:यांच्या चेह:यावरील भिती अद्याप दूर झालेली नाही. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी येणा:या-जाणा:यांची चौकशी करून आत सोडत आहेत. गावकरी देखील येणा:या-जाणा:यांकडे खिन्न नजरेने पहात आहेत. कधी एकदाचे विद्यार्थी शाळेत येतात. कधी शाळेतील किलबिलाट कानी येतो. आणि विद्याथ्र्याच्या उपस्थितीमुळे गावातील चैतन्य कधी परत येते याकडे गावकरी आता आस लावून बसले आहेत.13 पदे रिक्त, मुख्याध्यापकही प्रभारीच..आश्रमशाळेत एकुण 31 पदे मंजुर आहेत. त्यापैकी 18 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात केवळ सहा शिक्षक हे नियमित आहेत. उर्वरित सर्व कंत्राटी पद्धतीवरील व रोजंदारी कर्मचारी आहेत. मुख्याध्यापक मे महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर वरिष्ठ शिक्षक पी.व्ही.सोनवणे यांच्याकडे मुख्याध्यापकाचा पदभार दिला गेला आहे. विद्याथ्र्यासाठी अधीक्षक व विद्यार्थीनींसाठी अधिक्षिका कार्यरत आहेत. 413 विद्यार्थी घेताहेत शिक्षण..आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावीर्पयतचे एकुण 413 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात 373 विद्यार्थी निवासी आहेत. त्यापैकी 224 विद्यार्थी तर149 विद्यार्थीनी आहेत. याशिवाय 39 विद्यार्थी हे अनिवासी आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे विद्यार्थी येथे निवासी शिक्षण घेतात. गैरसोयींनी त्रस्त होते विद्यार्थीआश्रम शाळेत अनेक गैरसोयी असल्याचे दिसून आले. विद्यार्थी व विद्यार्थीनींना शौचालय, स्नानगृहाची सोय नसल्याचे चित्र आहे. आधी पत्र्याचे शेड होते. त्यात विद्यार्थीनींची शौचालयाची सोय होती. परंतु नवीन इमारत बांधकामाच्या वेळी ते तोडण्यात आले. आता नवीन इमारत बांधकाम झाले आहेत. तेथे काही सुविधा अपुर्ण असल्या तरी विद्यार्थीनींसाठी खालच्या मजल्यावरील शौचालये सुरू करण्यात आली. विद्यार्थी मात्र, परिसरातील शेतात उघडय़ावरच जातात. मेस हॉलमध्ये विद्यार्थीनींच्या राहण्याची सोय आहे. विद्यार्थी देखील एका हॉलमध्ये दाटीवाटीने राहतात.  तंटामुक्त व व्यसनमुक्त असलेले आदर्श गाव..गाव शांत आणि एकोप्याने राहणारे. संत आप श्री गुलाम महाराज यांच्या अनुयायींचे हे गाव. परिणामी व्यसनमुक्तीचा संदेश घरोघरी गेलेला.  ब्रिटीश काळापासून गावात दारूबंदी आहे. तंटामुक्तीचाही दोन लाखांचा पुरस्कार गावाला मिळालेला आहे. हगदारीमुक्तीचाही एक लाखांचा पुरस्कार गावाने मिळविलेला आहे. तळोदा पोलिसात गावातील एकही गुन्हा, किंवा तंटा नोंदला गेलेला नसल्याचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामकृष्ण पाडवी यांनी सांगितले. असे असतांना गावाची बदनामी झाल्याची सल गावक:यांना आहे. त्यांच्याशी संवाद साधतांना ते पावलोपावली जाणवत होते. कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.