आमदार राजेश पाडवी, डॉ. किशोर पाटील, मुख्याध्यापक भिला निळे, शिक्षक, आशा कार्यकर्ती, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच यांनी गावात फिरून कोरोनाबाबत जनजागृती केली. लसीकरण करणाऱ्यास प्रोत्साहन म्हणून आमदार पाडवी यांच्याकडून दोन किलो तांदूळ व दोन किलो साखर देण्यात आली. मुख्याध्यापकांनी लसीकरणाचे फायदे, दक्षता, काळजी काय घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराला सरपंच परबत पवार, ग्रा.पं. सदस्य सहदेव वाघ, पोलीस पाटील मोग्या पाडवी, अंबापूर प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मोहन पटेल, आडगाव केंद्राचे डॉ. नंदकुमार सुरसे, आरोग्य सेवक स्वप्निल नगराळे, पाठक उपस्थित होते. मुख्याध्यापक भिला निळे, काशीनाथ पाटील, यशवंत महेंद्र, महेश वळवी, शिवाजी पावरा, वंती वसावे यांनी टवळाई गावात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली.
टवळाई येथे शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST