ड्रोनद्वारे होणार गावठाण जमीन मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:15 PM2019-11-11T12:15:46+5:302019-11-11T12:15:55+5:30

ड्रोनद्वारे होणार गावठाण जमीन मोजणी मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जमिन मोजणीची प्रक्रिया किचकट असते. वेळ ...

The calculation of heavy ground by drone | ड्रोनद्वारे होणार गावठाण जमीन मोजणी

ड्रोनद्वारे होणार गावठाण जमीन मोजणी

googlenewsNext

ड्रोनद्वारे होणार गावठाण जमीन मोजणी

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जमिन मोजणीची प्रक्रिया किचकट असते. वेळ व मणुष्यबळ देखील मोठय़ा प्रमाणावर लागते. त्यावर उपाय म्हणून आता शासनाने गावांचे सिमांकन आणि गावठाण मोजणीसाठी थेट ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. या पद्धतीद्वारे एका गावाचे गावठाण अवघ्या एका दिवसात मोजले जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून त्याच्या आढाव्यासाठी सोमवार, 11 रोजी जिल्हास्तरीय बैठक होणार आहे.
जमिन मोजणीसाठी पारंपारिक पद्धत ही अत्यंत किचकट प्रक्रिया असते. खाजगी जमीन, गावठाण किंवा गावांचे सिमांकन करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यासाठी वेळ व श्रमही मोठय़ा प्रमाणावर लागतात. ही बाब लक्षात घेता भूमी अभिलेख विभागातर्फे त्यात विविध प्रकारचे बदल आतार्पयत करण्यात आले आहेत. या बदलांमध्येही अपेक्षीत वेग आलेला नाही. त्यामुळे आता ड्रोनद्वारे जमीन मोजणी केली जाणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, नगर जिल्ह्यात या पद्धतीने जमीन मोजणी केली जात आहे. लवकरच नंदुरबार जिल्ह्यात देखील हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
ईटीएस पद्धतीचा वापर
पूर्वी पारंपारिक पद्धतीत अर्थात सिमांकन करून जमीन मोजणी केली जात होती. त्याला मोठा कालावधी लागत होता. त्यानंतर इटीएस यंत्राच्या सहाय्याने जमीन मोजणी केली जावू लागली. यामुळे वेळ वाचला परंतु किचकट प्रक्रिया कायम राहिली. त्यापुढे जावून आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भुमिअभिलेख विभाग सरसावला  आहे. त्याकरीता विविध आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे. त्यातीलच ड्रोनद्वारे हवाई मोजणी करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. 
भुमी अभिलेखचे अभियान
जमीन मोजण्यासाठी भुमी अभिलेख विभागाने विशेष अभियान राबविण्या सुरुवात केली आहे. यासाठी त्यांना केंद्राच्या सव्र्हे ऑफ इंडिया विभागाचेही सहकार्य लाभत आहे. राज्य शासन आणि सव्र्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला हा पथदर्शी प्रकल्प पुणे, नगर नंतर नंदुरबारात राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रकल्प सुरू  होईल त्यावेळी डेहराडून येथील सव्र्हे ऑफ इंडियाचे पथक देखील येणार आहे.
आज आढावा बैठक 
4जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. 
4ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत 1.500 या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी 1.1000 या परिमाणात तयार होते.
4त्यानंतर मूळ अभिलेखाच्या आधारे वहिवाटीच्या नकाशावर सुपर इंपोज करुन नकाशावर हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात आणि त्या नकाशाच्या आधारावर मूळ अभिलेखाप्रमाणे अर्जदारास हद्दीच्या खुणा कायम करुन प्रत्यक्ष जागेवर नव्याने दाखवल्या जातात. अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते.
यासंदर्भात तयारी आणि आढावा घेण्यासाठी राज्याचे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम हे नंदुरबारात येत आहे. सोमवार, 11 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात यासंदर्भात माहिती दिली जाणार  आहे. 
नंदुरबार जिल्हा राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1.62 टक्के म्हणजेच 5,955 चौ.कि.मी.क्षेत्रफळ व्यापले असून राज्यात क्षेत्रफळाच्या क्रमवारीमध्ये जिल्ह्याचे 31 व्या क्रमांकाचे स्थान आहे. जिल्ह्यातील एकुण सहा तालुक्यांची शासन मुलकी सोयीच्या दृष्टीने विभागणी करण्यात आली आहे.  मुलकी सोयीच्या दृष्टीनेच नंदुरबार, शहादा व तळोदा या तीन उपविभागात देखील विभागणी करण्यात आली आहे. नंदुरबार उपिवभागात नंदुरबार व नवापूर या तालुक्यांचा, शहादा उपिवभागात शहादा व अक्राणी  तर तळोदा उपिवभागात अक्कलकुवा व तळोदा  तालुक्यांचा समावेश आहे.
जमिन मोजण्याची प्रक्रिया सुरळीत व वेगाने व्हावी यासाठी ड्रोनद्वारे जमिन मोजणीचा पथदर्शी प्रकल्प राज्यात सुरू करण्यात आला आहे. यासाठी नंदुरबारचीही निवड करण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभाग आणि सव्र्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राहणार आहे. लवकरच त्याची सुरुवात होणार आहे.                   -एस.चोक्कलिंगम, राज्य जमाबंदी आयुक्त.

Web Title: The calculation of heavy ground by drone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.