तळोद्याच्या बैल बाजारात एकाच आठवडय़ात 55 लाखांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:05 PM2019-11-13T22:05:38+5:302019-11-13T22:05:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पारंपरिक शेतीत अढळ स्थान असलेल्या पशुधनाची खरेदी- विक्री करणारे मोजकेच बाजार जिल्ह्यात तग धरुन ...

The bullock market in Taloja has a turnover of 55 lakhs in one week | तळोद्याच्या बैल बाजारात एकाच आठवडय़ात 55 लाखांची उलाढाल

तळोद्याच्या बैल बाजारात एकाच आठवडय़ात 55 लाखांची उलाढाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पारंपरिक शेतीत अढळ स्थान असलेल्या पशुधनाची खरेदी- विक्री करणारे मोजकेच बाजार जिल्ह्यात तग धरुन आहेत़ यात तळोदा येथील बैलबाजार अग्रक्रमावर असून रब्बी हंगामाला सुरुवात होत असल्याने येथील बैल बाजार तेजीत आह़े गेल्या आठवडय़ात बाजारात तब्बल 55 लाख रुपयांच्या बैल जोडय़ांची खरेदी विक्री झाल्याची माहिती आह़े 
तळोदा शहरातील हातोडा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर शुक्रवारी भरणा:या बैल बाजारासाठी बुधवारपासून बैलांची आवक सुरु होत असत़े गेल्या आठवडय़ात भरलेल्या बाजारात 500 बैलांची आवक होऊन 306 बैलांची विक्री झाली होती़ यातून 55 लाख रुपयांची उलाढाल झाली होती़ हीच स्थिती येत्या दोन दिवसानंतर शुक्रवारी भरणा:या बाजारात कायम राहणार असल्याचे चित्र आह़े बुधवारी दिवसभरात 100 बैलांची आवक झाल्याने रब्बी हंगामाची जोरदार तयारी सुरु झाल्याचे चित्र दिसून आले आह़े 
सातपुडय़ाच्या दुर्गम भागातून येथे ‘गावठी’ या मूळ प्रजातीचे बैल प्रामुख्याने विक्रीसाठी आणले जातात़ कामासाठी काटक आणि निरोगी असलेले हे बैल कोणत्याही प्रकारच्या शेतीकामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या कानाकोप:यातून शेतकरी आणि व्यापारी या बैलांची खरेदी करण्यासाठी येथे दाखल होतात़ जास्तीत जास्त 90 हजार रुपयांर्पयत दज्रेदार बैलजोडी मिळत असल्याने शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला येथे हजेरी लावतात़ सध्या रब्बीची लगबग सुरु असल्याने बैलांची खरेदी विक्री वाढली आह़े आगामी दोन आठवडे  बाजारातील तेजी टिकून राहणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
गेल्या शुक्रवारी धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील शेतक:यांनी हजेरी लावून बैलांची खरेदी केली होती़ या बाजारात एका आर्थिक वर्षात 10 कोटी रुपयांर्पयत बैल खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: The bullock market in Taloja has a turnover of 55 lakhs in one week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.