दुचाकी अपघातात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 13:05 IST2020-12-31T13:05:08+5:302020-12-31T13:05:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहादा तालुक्यातील पिंप्राणी गावाजवळ भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना मंगळवारी ...

Both injured in two-wheeler accident | दुचाकी अपघातात दोघे जखमी

दुचाकी अपघातात दोघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  शहादा तालुक्यातील पिंप्राणी गावाजवळ भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. अपघातात दोघे जखमी झाले आहेत. 
महेश अत्र्या भंडारी (रा. लिंबर्डी, ता. शहादा) व सिलदार पावरा (रा. साबलापाणी) अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी महेश भंडारी हा युवक दुचाकीने (क्र. एमएच १८ एके ६०२७) पिंप्राणी रस्त्याने जात असताना समाेरून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमएच ३९-९१३१) त्यांना जोरात धडक दिली. यात महेश भंडारी व सिलदार पावरा हे दोघेही जखमी झाले. दोघांना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. 
 याबाबत महेश भंडारी याच्या फिर्यादीवरून दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल गुलाब पावरा करत आहेत.

Web Title: Both injured in two-wheeler accident