बोअरवेलच्या ट्रकने दुचाकीला चिरडले; एक ठार, दोन जण जखमी

By मनोज शेलार | Published: March 30, 2023 04:45 PM2023-03-30T16:45:45+5:302023-03-30T16:46:45+5:30

मागील चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Borewell's truck crushed the bike; One killed, two injured at nandurbar | बोअरवेलच्या ट्रकने दुचाकीला चिरडले; एक ठार, दोन जण जखमी

बोअरवेलच्या ट्रकने दुचाकीला चिरडले; एक ठार, दोन जण जखमी

googlenewsNext

नंदुरबार - बोअरवेलच्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना नंदुरबारातील वळण रस्त्यावरील कल्याणेश्वर मंदिरासमोर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मांगीलाल शिवलाल भोये (४०, रा. ऐचाळे, ता. साक्री) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी रेखाबाई मांगीलाल भोये (३६) व रुद्र भोये (१० महिने) हे जखमी झाले.

पोलिस सूत्रांनुसार, मांगीलाल भोये हे त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच १८ बीवाय ५१९८) वळण रस्त्याने कोकणीहिल भागात जात होते. कल्याणेश्वर मंदिरासमोरील लहान पुलाजवळ आले असता भरधाव आलेल्या बोअरवेलच्या ट्रकने (क्रमांक केए ०१ एमएन २१२२) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे दुचाकीवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. पत्नी व मुलगा बाजुला फेकले गेले तर मांगीलाल भोरे हे दुचाकीसह ट्रकखाली आले. मागील चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

याबाबत रेखाबाई भोये यांनी फिर्याद दिल्याने ट्रकचालक नागराजन करपिया वेल्लालर (४०, रा. अडतांगी, तामिळनाडू) याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.

Web Title: Borewell's truck crushed the bike; One killed, two injured at nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात