आदिवासी कारखान्याचे बाॅयलर अग्नीप्रदीपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:52 PM2020-10-27T12:52:14+5:302020-10-27T12:52:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारेचा १८ वा गळती हंगाम नोव्हेंबरच्या पुढील पंधरवाड्यात सुरू होईल. ...

Boiler lighting of tribal factory | आदिवासी कारखान्याचे बाॅयलर अग्नीप्रदीपन

आदिवासी कारखान्याचे बाॅयलर अग्नीप्रदीपन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारेचा १८ वा गळती हंगाम नोव्हेंबरच्या पुढील पंधरवाड्यात सुरू होईल. तसेच मागील हंगामाचे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांची रक्कम बॅकेत जमा केली आहे. याबाबत एक ही शेतकऱ्यांची तक्रार नाही. तसेच ऊस तोडणी मजुरांची रक्कमदेखील अदा करण्यात आली आहे, असे प्रतिपादन साखर कारखान्याचे व्यवस्थापक विजयानंद कुशारे यांनी १८ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात केले आहे.
आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारेचा १८ वा गळीत हंगाम दसऱ्‍याच्या शुभमुहूर्तावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता बॉयलर अग्नीप्रदीपन करून शुभारंभ करण्यात आला. कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद अमृत भानुदास पाडवी व त्यांच्या पत्नी मंगलाबाई अमृत पाडवी, कारखान्याचे संस्थापक चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री सुरूपसिंग नाईक, आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शासनाच्या आदेशान्वये फिजिकल अंतराचे पालन करून  बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
या वेळी संचालक बाळू नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, कारखान्याचे व्हा.चेअरमन सखाराम गावीत, संचालक मगन वळवी, भामटू भिल, लक्ष्मन कोकणी, सयाबाई नाईक, विना वसावे, छगन वसावे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रतनजी गावीत, कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गावीत, धिरसिंग गावीत, दिगंबर गावीत, तानाजी वळवी, पंचायत समिती सदस्य दारासिंग गावीत, दशरथ गावीत, रायपूरचे सरपंच ईश्वर गावीत, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व पदधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कारखान्याचे कार्यालयीन अधिक्षक दिलीप पवार तर आभार भुपेंद्र वसावे यांनी मानले. 
कार्यक्रमासाठी सुभाष माळी, ईश्वर जोशी, प्रभाकर निकम, अनिल पाटील, पीतांबर महाजन, अनंतराव देसाई, प्रकाश वळवींसह सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Boiler lighting of tribal factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.