लोकमत न्यूज नेटवर्कशहादा: विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सभासद व पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात तळोदा, नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा तालुक्यातील ४५ तांत्रिक कामगारांनी रक्तदान केले.शहादा येथील गांधीनगरमधील महात्मा गांधी सभागृहात घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता किसन पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पावरा म्हणाले की, संघटना विविध चांगले उपक्रम राबवत आहे.कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचा चांगला उपक्रम घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती असूनही महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगारांचा रक्तदानासाठी उत्साह वाखवण्याजोगा असल्याचे म्हणाले.तळोदा, नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा तालुक्यातील ४५ तांत्रिक कामगारांनी स्वेच्छेने रक्तदान केले. धुळे येथील नवजीवन रक्तपेढीचे डॉक्टर व कर्मचाºयांनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले. शिबिरासाठी संघटनेचे पदाधिकारी गुलाबराव सोनवणे, नितीन रणदिवे, सुनील पाटील, प्रकाश मराठे, नाजीम पिंजारी, दिनेश बागूल, बापू महाजन, रामकृष्ण शेवाळे, महेश पाटील, शांतीलाल वसईकर, अमोल सोनवणे, संजय चौधरी, बडगुजर आदींसह सर्व तांत्रिक कामगारांनी सहकार्य केले.
वीज तांत्रिक कामगार युनियनतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:25 IST