लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जनतेने भाजपला कौल दिला आहे. शिवाय राष्टÑवादीचे तीन सदस्य देखील भाजपला समर्थन देणारे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता बसेल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी व्यक्त केला.जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच मोठे यश मिळविले आहे. जनतेने २३ जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या आहेत. राष्टÑवादीचे तीन सदस्य देखील भाजपच्या समर्थनावरच निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ अधीक होते. परिणामी बहुमताचा २९ चा आकडा गाठण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. परिणामी कुठल्याही परिस्थितीत भाजप जिल्हा परिषदेवरील सत्तेचा दावा सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट ेकेले.जिल्ह्यातील सर्व नेते व पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येवून बहुमताची जुळवाजुळव करण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेवर भाजपचीच सत्ता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 12:24 IST