शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शहादा मतदारसंघ राखण्यात भाजप यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघात  भारतीय जनता पक्षाचे  राजेश उदेसिंग पाडवी हे 7991 मतांनी विजयी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघात  भारतीय जनता पक्षाचे  राजेश उदेसिंग पाडवी हे 7991 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे पद्माकर वळवी यांचा पराभव करीत हा मतदारसंघ भाजपाकडे राखण्यात यश मिळवल़ेशहादा -तळोदा  विधानसभा संघाची मतमोजणी दुपारी साधारण 11. 30 वाजता पुर्ण झाली. येथील नवीन तहसील  कार्यालयात मतमोजणी करण्यात आली मतमोजणी साठी 14 टेबलवर 25 फे:या करण्यात आल्या़ पोस्टल मतदानासह 2 लाख 10 हजार 389 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़  या मतदारसंघात  भाजपाचे राजेश उदेसिंग पाडवी यांना सुमारे 94 हजार 931 मते मिळाली तर  प्रतिस्पर्धी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अॅड़ पद्माकर वळवी यांना 86 हजार 940 मते मिळाली.  राजेश पाडवी हे 7 हजार 991 मतानी विजयी झाल़़े  तर माकपाचे जयसिंग माळी यांना 4 हजार 60 आणि अपक्ष उमेदवार जेलसिंग पावरा यांना 21 हजार 113 मते मिळाली़ नोटाला तब्बल 3 हजार 449 मतदारांनी पसंती दिली़ पोस्टल बॅलेट मतदानातून 126 मते बाद झाली आहेत़ दरम्यान, मतमोजणी सुरू असताना पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे पद्माकर वळवी यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती ही आघाडी सहाव्या फेरीपयर्ंत कायम होती़ त्यामुळे काँग्रेस गोटात आनंदाचे वातावरण होते मात्र सातव्या  फेरीपासून भाजपाचे राजेश पाडवी यांनी वळवी यांची आघाडी कमी करीत आघाडी मिळविण्यास सुरवात केल्यानंतर ही आघाडी वाढतच गेली़ त्यामुळे भाजपाच्या गोटात उत्साह संचारला होता़ संचारलेला हा उत्साह विजय प्राप्त झाल्यानंतर शिगेला पोहोचला होता़ भाजपाच्या या विजयामुळे  काँगेस गोटात शांतता पसरली तरी देखील पद्माकर वळवी यांनी एकाकी  खिंड लढवत मिळवलेली मते देखील राजकीय धुरिणाना विचार करण्यास भाग पाडणारी आहेत़ निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी डॉ़चेतन गिरासे, तहसिलदार डॉ. मिलींद कुलकर्णी, पंकज लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक कर्मचा:यांकडून प्रक्रिया पुर्ण करुन घेतली़

 राजेश पाडवी यांच्या विजयानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमाणपत्र मिळण्यास उशीर असल्याचे समजताच सर्व विजयी उमेदवार पाडवींसह भाजपाचे सर्व पदाधिकारी शहरातील महात्मा गांधी, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांर्पयत रॅली काढून अभिवादन केल़े शहरात तीन गटांकडून एकाच वेळी वेगवेगळ्या विजयी रॅली काढण्यात आल्या़ विजयी मिरवणूकीत गट-तट उफाळून आल्याने उपस्थितांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होत़े