शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सीसीटीव्हीमुळे फुटले अखेर बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बुधवारचा दिवस नंदुरबारकरांसाठी धक्कादायक ठरला. भर वस्तीत असणाऱ्या डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा पडल्याची खबर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बुधवारचा दिवस नंदुरबारकरांसाठी धक्कादायक ठरला. भर वस्तीत असणाऱ्या डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात सशस्त्र दरोडा पडल्याची खबर कानोकानी शहरभर पसरली आणि काळजीचा सूर निघाला. पोलिसांना आव्हान ठरणारा हा दरोडा पोलिसांनीच अवघ्या सहा तासात संशयीतांना अटक करून गुन्हा उघडकीस आणला. कार्यालयातील नोकरच या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह त्याच्या इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला गेला.नंदुरबारात सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास गणपती मंदीरामागील मुख्य रस्त्यावर असलेल्या डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात ही घटना घडली. सकाळी कार्यालयात सफाईसाठी आलेल्या नोकराला दोघांनी बांधून ठेवत तब्बल १५ लाख ६९ हजार रुपये लांबविले. नोकराने आरडाओरड केल्यानंतर घटना उघडकीस आली. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. भल्या सकाळी घडलेली घटना आणि लपांस झालेली तब्बल १५ लाखांची रक्कम यामुळे पोलिसांनी ही घटना गांभिर्याने घेत तपासाचे आव्हान स्विकारले.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडि, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले व शहर पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर, उपनिरिक्षक महेश क्षिरसागर, सुनील बिºहाडे, प्रदीप सोनवणे, प्रवीण महाले यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे तपासाच्या दिशा निश्चित केल्या. त्यानुसार सुरुवातीला सीसीटीव्ही धुंडाळण्यात आले. कार्यालयातील सीसीटीव्ही, रस्त्यावरील दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही यांचे फुटेज काढण्यात आले. त्या आधारे तपासाला गती देण्यात आली.कार्यालयातील सीसीटीव्ही मध्ये जो नोकर काम करीत होता त्याच्याशी सुरू असलेली दरोडेखोरांची झटापट, दोघांपैकी एकाने बॅगेतून काढलेली पिस्तोल व तिचा दाखविलेला धाक आणि रक्कम सापडवतांना अगदी सहज वावरण्याची त्यांची पद्धत. पैसे घेऊन दोघेजण रस्त्यावरून अगदी आरामात जातांनाचे फुटेज यावरून पोलिसांना शंका आली. शिवाय कार्यालयात एवढी मोठी रक्कम असल्याची माहिती दरोडेखोरांना कशी मिळाली यादृष्टीने तपास केला गेला. आणि संशयाची सूई तेथे काम करणाºया नोकरावर गेली. त्याला ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्याने घटनाक्रमाची माहिती दिली आणि दरोड्याचे बिंग फुटले.सीसीटीव्ही आवश्यकया घटनेच्या माध्यमातून प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानात आणि बाहेरील बाजूला सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे. शहरातील मुख्य चौकात असे कॅमेरे आहेत. परंतु त्यांना मर्यादा आहे. जर प्रत्येक कार्यालय आणि व्यापाºयांनी ते बसविले तर चोरट्यांना निष्पन्न करणे सहज शक्य होते. यासाठी पोलिस दलाने देखील आवाहन करणे आवश्यक आहे. शिवाय ज्या चौकात आणि रस्त्यावर असे कॅमेरे नाहीत त्या ठिकाणी ते बसविण्यासाठी नियोजन करावे.४कार्यालयात काम करणारा उमेदसिंग याने आपल्या इतर तीन साथीदारांना कार्यालयातील पैशांची माहिती आदल्या रात्री दिली. या चौघापैकी दोघांनी मंगळवारी रात्री सरस्वतीनगरातील विक्रमसिंग राजपूत यांच्या घरातून चार लाख रुपये लांबविले. सकाळी सव्वा आठ वाजता ठरल्याप्रमाणे तीनजण आले.४आतमध्ये उमेदसिंग हा सफाईचे काम करीत होता. त्याला मारहाण करीत त्याच्या कानाला पिस्तोल लावून त्याला किचनमध्ये बांधून ठेवले. आणि ड्राव्हरमधील सर्व पैसे काढून नेले. जातांना त्यांनी मागील बाजुच्या जैन मंदीराजवळील बोळीतून तूप बाजाराकडे गेले. सीसीटीव्हीत ते दिसून येते. त्याचप्रमाणे श्वान पथकाने देखील तोच मार्ग दाखविला.४यापूर्वी याच भागात अर्थात जैन मंदीराच्या समोरील बोळीतील अंगडाईया कुरियर सर्व्हीसमधून सायंकाळच्या वेळी पिस्तोलचा धाक दाखवून लाखो रुपये लंपास करण्यात आले होते. त्यानंतर या भागात ही दुसरी मोठी घटना घडली आहे.४सराफा बाजारात देखील आठ वर्षांपूर्वी सकाळीच दरोडा पडला होता. चारचाकीमध्ये आलेल्या चौघांनी गोळीबार करीत दागीन्यांची बॅग लांबविली होती. त्यांना माहिती देणारा स्थानिक संशयीत निष्पन्न झाला होता.