शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या जमीन खरेदीत मोठा घोटाळा,खासदार राजेंद्र गावीत यांचा राज्य शासनाला घरचाच आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे खरेदी करून आदिवासींना भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे. विशेष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे खरेदी करून आदिवासींना भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या वर्षभरात सर्वाधिक जमीन हस्तांतरणाची प्रकरणे घडल्याचा आरोप शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीच सरकारवर आरोप केल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.खा. राजेंद्र गावित यांनी पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे जिल्ह्यांतील आदिवासी शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या राज्यात आदिवासींच्या जमिनी बिल्डर, भांडवलदार, बिगर आदिवासी व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. वास्तविक १९७४ च्या जमीन हस्तांतराच्या कायद्यानुसार ते बेकायदेशीर आहे. मात्र, महसूल विभागाने त्याकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी भाजपचे सरकार होते; पण त्या काळातही घडल्या नाहीत तेवढ्या आदिवासी जमीन हस्तांतराच्या घटना या वर्षभरात घडल्या आहेत. वास्तविक राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. नेहमीच आदिवासींची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसकडे महसूल खाते आहे. असे असतानाही आदिवासींना न्याय मिळत नाही. आदिवासींच्या जमिनी कमी दरात खरेदी करून बळकावल्या जात आहेत. त्याकडे राज्य शासनाने विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. आदिवासींच्या जमिनी खरेदीबाबत राज्य शासनाने ‘आंध्र पॅटर्न’चे अवलोकन करून त्या धर्तीवर राज्यातही धोरण राबविण्याची आवश्यकता आहे. सरकारने जर वेळीच लक्ष घातले नाही तर यासंदर्भात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचीही भेट घेणार असल्याचे खा. राजेंद्र गावित यांनी सांगितले.