लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावर्ती भागात धुमाकूळ घालणा:या नरभक्षक बिबटय़ास महाराष्ट्र वन विभागातील अधिका:यांच्या सहकार्याने पानसेमल वनपरिक्षेत्रातील जुनापाणी जंगलातून जेरबंद करण्यात यश आले आहे. बिबटय़ाच्या दहशतीखाली जगणा:या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. बिबटय़ास जेरबंद करण्यासाठी नागरिकांचा वनविभागावर प्रचंड दबाव होता.महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावर्ती भागात दोन मुले, एक महिला व पाळीव प्राण्यांना ठार करणा:या बिबटय़ास मंगळवारी दुपारी 12 वाजता पानसेमल परिक्षेत्रातील जुनापाणी जंगलात लावण्यात आलेल्या पिंज:यात कैद केले. या वेळी बिबटय़ास बघण्यास नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. तोरणमाळ वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एस.के खुणे व वनपाल बी.के. थोरात, वनरक्षक अमर पावरा व सहका:यांनी मध्यप्रदेशातील मंगेश बुंदेला, वनपाल प्रमोद गुजर यांच्यासोबत बिबटय़ास जेरबंद करण्यासाठी सीमावर्ती भागात अनेक दिवस पेट्रोलींग केले होते. तसेच दररोज संपर्कात होते. मंगळवारी बिबटय़ाच्या मागावर असलेली राणा मंडळ रेशक्यू टिमचे कटारी, प्रवीण मीना, मुरली धाकड, वनरक्षक बाबुलाल खन्ना, संतोष अलोने, प्रमोद गुजर, बाबुलाल मोरे, नीलेश पाटील, राजा मोरे यांनी बिबटय़ास जेरबंद केले. वरिष्ठ अधिका:यांच्या आदेशाने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी 2019 या महिन्यात शहादा तालुक्यातील लक्कडकोट व आंबापूर शिवारात ऊस तोडण्यासाठी आलेले नागपूर पोस्ट वर्धाने, ता.साक्री जि.धुळे येथील परिवारातील दादू देवाजी जगताप (10) या मुलास जेरबंद बिबटय़ाने ठार केल्याचा कयास आहे. तसेच अंबापुर ते टवळाई रोडवर दोन युवकांना बिबटय़ाने जखमी केले होते. तर प्रधान कडवा पराडके, शेरसिंग दारासिंग ठाकरे, दिलवरसिंग जंगू शेंबडे, अनिल हिम्मत तडवी, देविदास सोनू पटले रा.गणोर, ता.शहादा, रोहिदास धुडकू चित्ते रा.आवगे, ता.शहादा येथील शेळी पालकांच्या शेळ्या बिबटय़ाने फस्त केल्या होत्या. 27 जुलै रोजी खेतियापासून जवळच असलेल्या भडगोन ता.पानसेमल येथील शेतकरी ओंकार जामुन चव्हाण यांच्या शेतात संगिता विजय आर्य (17) या युवतीस मागून झडप घालून उसाच्या शेतात ओढून नेत ठार केले होते. या घटनेमुळे परिसरात शेतकरी व मजूर वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या वेळी सेंधवा वनविभागाचे उपवनसंरक्षक के.एस. पट्टा, पानसेमल वनपरिक्षेत्राचे सहाय्यक प्रवीण पवार, खेतिया भुरूखा, कर्मचारी प्रमोद गुजर, महेश तोमर, नीलेश पाटील, बाबुलाल मौर्या, अनिल चव्हाण, जितेंद्र मुवेल, संतोष सोनवणे यांनी बिबटय़ाला पकडण्यासाठी रात्रदिवस मेहनत घेतली होती. मात्र त्यांना बिबटय़ाने हूल दिली होती. 23 ऑगस्ट 2019 रोजी पानसेमल तालुक्यातील जुनापाणी येथील शेतकरी रवींद्र रंगराव पाटील यांच्या शेतात चारा कापत असलेली वरीबाई कांतीलाल रावताळे (45) या महिलेवर बिबटय़ाने अचानक हल्ला करी दूर्पयत ओढत नेऊन लचके तोडून ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे जुनापाणी परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. या वेळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मंगेश बुंदेला यांनी आपल्या सहका:यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र बिबटय़ा सापडला नसल्याने नागरिकांच्या रोषाला अधिका:यांना सामोरे जावे लागले होते. याप्रसंगी वनविभागाच्या कार्यालयास संतप्त जमावाने घेराव घातला होता. या वेळी त्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. नागरिकांची मागणी मान्य करत उपवनसंरक्षक के.एस. पट्टा व प्रांताधिकारी विजय गुप्ता यांनी तोरणमाळ वन विभागातील पिंजरे या परिसरात लावले होते. विशेष म्हणजे मंगळवारी ज्या पिंज:यात बिबटय़ा अडकला तो पिंजरा तोरणमाळ वन विभागाचा आहे. बिबटय़ाने ज्या ज्या ठिकाणी हल्ला केला. त्या त्या ठिकाणावरून घेतले पायाचे ठशे, जेरबंद केलेल्या बिबटय़ाच्या पायाच्या ठश्यांशी जुळत असल्याने हा तोच नरभक्षक बिबटय़ा असल्याचा अधिका:यांचा कयास आहे.
पानसेमल येथे अखेर बिबटय़ा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:30 IST