खबरदार, विनाकारण फिराल तर थेट गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:47 AM2020-04-02T11:47:54+5:302020-04-02T11:48:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक ...

Beware, direct crime without cause and direct crime | खबरदार, विनाकारण फिराल तर थेट गुन्हे

खबरदार, विनाकारण फिराल तर थेट गुन्हे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक गावात फेरफटका मारतात. परिणामी गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत असल्यामुळे पोलिसांनी सक्तीने कारवाईला सुरुवात केली आहे. शहर वाहतुक शाखेने दोन दिवसात १७५ वाहने जमा करण्यात आली आहेत. तर एक लाखाच्या वर दंड वसुल करण्यात आला आहे. शहर, उपनगर व तालुका पोलिसांतर्फे देखील बाहेर फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करीत आहेत.
संचारबंदी काळात नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरत आहेत. यामुळे शासनाचा लॉकडाऊनचा उद्देशाला हारताळ फासला जात आहे. प्रशासनाने बाजाराचे अलगीकरण करून देखील नागरिक आपल्या परिसरात खरेदी करण्याऐवजी शहरातच येत आहेत. काही जण विनाकारण फेरफटका मारण्यासाठी शहरात येत आहेत. नागरिकांना आवाहन करून देखील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आता थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.
१७५ वाहने जमा
पोलीस अधीक्षकांनी शहर वाहतूक शाखेला याबाबत कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. विनाकारण शहरात वाहने येत असल्यास त्यांची चौकशी करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सकाळी १० वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून पॉर्इंट लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालक आढळून आल्यास आधी त्याची चौकशी केली जात आहे. त्यानंतर थेट वाहने जमा केली जात आहेत. दोन दिवसात १७५ वाहने जमा करण्यात आली. जमा केलेली वाहने दंड भरून सोडली जात आहेत. त्यात पीयूसी, नंबर प्लेट, साईड ग्लास, रजिस्ट्रेशन, चालविणाºयाचे लायसन्स यासह इतर बाबी पाहिल्या जात आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून तो एकत्रीत दंड वसुल केला जात आहे. १७५ पैकी ९५ जणांनी आतापर्यंत या प्रकारचे दंड भरून वाहन सोडविले आहेत.
एक लाखापेक्षा अधीक दंड
वाहन जमा करण्यासह आॅनलाईन दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. आतापर्यंत दोन दिवसात एक लाखापेक्षा अधीक दंड वसुल करण्यात आला आहे. दंड हा आॅनलाईन आहे.
एक अधिकारी ४० कर्मचारी
कारवाईसाठी एक अधिकारी व ४० कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. शहरातील चारही चौफुली, मुख्य रस्ते, उड्डाणपूल या ठिकाणी पॉर्इंट लावण्यात आले आहेत. तेथे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह शहर व उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तैणात आहेत.

शहरात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाºया सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांची चांगलची दहशत निर्माण झाली आहे. शहर वाहतुक शाखेतर्फे देखील दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अधाटे यांच्यासह त्यांच्या ४० कर्मचाºयांचे पथक यासाठी कार्यान्वीत आहेत. शहर वाहतूक शाखेच्या जोडीला शहर पोलीस ठाणे आणि उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तैणात करण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी चालकांचे शहरात येण्याचे प्रमाण कमालची रोडावले आहे.

Web Title: Beware, direct crime without cause and direct crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.