आरोग्य व स्वच्छतेवरील उपकरणांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:28 PM2020-02-16T13:28:45+5:302020-02-16T13:28:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : आरोग्य विज्ञान आणि स्वच्छतेवर आधारीत उपकरणांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बाजी मारली. दोन दिवशीय विज्ञान ...

The bet on health and hygiene equipment | आरोग्य व स्वच्छतेवरील उपकरणांची बाजी

आरोग्य व स्वच्छतेवरील उपकरणांची बाजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : आरोग्य विज्ञान आणि स्वच्छतेवर आधारीत उपकरणांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बाजी मारली. दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप शनिवारी प्रकाशा येथे झाला.
प्रकाशा येथील सर्वोदय विद्यामंदीरात दोन दिवशीय विज्ञान प्रदर्शनचा समारोप शनिवारी झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, विकास इंग्लिश मीडियम स्कूलच्या समन्वयक प्रीती अभिजीत पाटील, सर्वोदय विद्या मंदिराचे प्राचार्य आय.डी.पटेल, जि.प. सदस्य भारती ठाकरे, प.स.सदस्य जंग्या भिल, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकेश पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी निकाल जाहीर करून यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांना गौरविण्यात आले. निकाल पुढील प्रमाणे : प्राथमिक गटात प्रथम-शेख अरबाज साजिदभाई एन डी सार्वजनिक हायस्कूल नवापूर, द्वितीय- अक्षय ईश्वर तडवी, विद्या गौरव इंग्लिश मीडियम आमालाड, तृतीय- वेदांत तारकेश्वर पटेल, अभिनव विद्यालय नंदुरबार तर उत्तेजनार्थ दीपेश मुरलीधर बहिरम एकलव्य विद्यालय नंदुरबार.
माध्यमिक गटात प्रथम क्रमांक- सय्यद अनम सबरार, उर्दू हायस्कूल नंदुरबार, द्वितीय हिमांशू योगेश पाटील, महावीर इंग्लिश स्कूल शहादा, तृतीय- सोमेश महेश जोशी, डी. आर. जुनियर नंदुरबार तर उत्तेजनार्थ अनमोल अशोक गावित वनवासी विद्यालय चिंचपाडा.
अध्यापक साहित्य निर्मिती माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक- मालजी जाण्या गावित, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा. प्राथमिक गट प्रथम क्रमांक योगेश रोहिदास खराडे, आश्रम शाळा सोनखाब.
लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात प्रथम संजय विठ्ठल पटेल, जीटीपी कन्या विद्यालय, तिताली-शनिमांडळ.
माध्यमिक गटात प्रथम विद्या कुंदन सोनवणे, एस. ए. मिशन हायस्कूल नंदुरबार.
प्रयोग शाळा कर्मचारी प्रायोगिक साधन गटात प्रथम- राहुल वसंत चकणे अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा कोचरा.
परीक्षक म्हणून शहा आसिफ अरमान, गणेश एन.सोनवणे, मानव गजानन उपगडे, डॉ. भरत नगिंन पाटील, डॉ. महेंद्र हिरालाल माळी, व्ही.सी. डोळे, एस. पी. पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: The bet on health and hygiene equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.