Bengal artisans spread the gold of the martyr's businessmen | शहाद्यातील सराफा व्यावसायिकांचे सोने घेवून बंगाली कारागिर पसार

शहाद्यातील सराफा व्यावसायिकांचे सोने घेवून बंगाली कारागिर पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा  : शहरातील सराफा व्यावसायिकांकडून दागिने बनविण्यासाठी देण्यात आलेले सोने घेऊन बंगाली कारागीर फरार  झाला असून जवळपास अर्धा ते एक किलो सोने लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस सूत्रांनुसार, बंगाली कारागिरांकडून शहर व ग्रामिण भागातील सराफा व्यापारी व सोने-चांदीचे दागिने विक्री करणारे सोन्याचे आभूषणे व दागिने बनवून घेतात. हा व्यवहार ब:याच वर्षापासून सुरू आहे. असेच दागिने बनविण्यासाठी एका बंगाली कारागिराकडे सराफा व्यापा:यांनी सोने देत होते. सोने दिल्यानंतर मागणीप्रमाणे हा कारागीर दागिने देण्यासाठी येत असे. मात्र सोमवारी हा कारागीर 12 वाजेर्पयत संबंधित व्यावसायिकांना दागिने देण्यासाठी आला नाही. हा प्रकार ज्या व्यापा:यांनी या कारागिराकडे सोने दिले होते त्यांनी एकमेकांकडे चौकशी केल्यानंतर लक्षात आला. त्यानंतर व्यावसायिकांनी त्याचे दुकान व घरी तपास केला असता तो परिवारासह गायब झाल्याचे निदर्शनास आले. कोणत्या व्यावसायिकाचे किती सोने होते याची जुळवाजुळव सुरू असून सराफा व्यावसायिकांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घटना सांगितली. नंदुरबार येथून एलसीबीच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही लागलीच तपासाला सुरुवात केली. रात्री उशीरार्पयत पोलीस स्टेशनला घटेनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, या कारागिराकडे कोणत्या व्यापा:याने किती सोने दिले होते याची जुळवाजुळव झाल्यावरच किती सोने घेऊन हा कारागीर गायब झाला हे समजणार आहे. मात्र शहर व परिसरात दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती.
 

Web Title: Bengal artisans spread the gold of the martyr's businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.