‘ड्राय डे’ चे उल्लंघन केल्याने मंगळबाजारातील बियर बार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:40 PM2019-10-12T12:40:12+5:302019-10-12T12:40:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक आणि सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर मद्यविक्रेत्यांना ‘ड्राय डे’ पाळण्याचे आदेश असतानाही मंगळबाजारातील परमिट रुम ...

Beer bar seals in Mars market for violating 'Dry Day' | ‘ड्राय डे’ चे उल्लंघन केल्याने मंगळबाजारातील बियर बार सील

‘ड्राय डे’ चे उल्लंघन केल्याने मंगळबाजारातील बियर बार सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणूक आणि सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर मद्यविक्रेत्यांना ‘ड्राय डे’ पाळण्याचे आदेश असतानाही मंगळबाजारातील परमिट रुम बियर बारमध्ये मद्यविक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्कच्या पथकाने बार सिल करण्याची कारवाई केली़ शहरात प्रथमच एखादा बार सील करण्याची कारवाई करण्यात आली असून परवाना निलंबित केल्याची माहिती आह़े
मंगळवारी दस:यानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील 320 परवानाधारक मद्य विक्रेते व बारमालकांना ड्राय डे पाळण्याचे आदेश दिले होत़े परंतू या आदेशांचे उल्लंघन करुन मंगळबाजारातील हॉटेल विजय येथे दस:याच्या दिवशी मद्यविक्री झाल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ त्यानुसार तपासणी केल्यानंतर प्रकरणाची सत्यता समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली़ संबधित मद्यविक्री परवाना धारकाला परवान्यावरील व्यवहारास पूर्णपणे बंदी केल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेतं़ 
उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, नाशिक विभागाचे उपआयुक्त अजरुन ओहोळ, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक संजय परदेशी उपनिरीक्षक शैलेंद्र मराठे, बबन चौथे, मनोज संबोधि यांची पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत़ त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली़ 
दरम्यान एलसीबीच्या पथकाने धडगाव तालुक्यातील खर्डाचा पाटीलपाडा येथे  छापा टाकून 3 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ गुरुवारी पथकाने ही कारवाई केली़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना येथे अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी याठिकाणी छापा टाकला असता येथे विदेशी मद्याचा अवैध साठा आढळून आल्या़ पथकाने भिका दामज्या वळवी रा़ खर्डा याला ताब्यात घेतले तर मंगल हिंमत पावरा रा़ माळ ता़ धडगाव हा पळून गेला़ 
पथकांनी आदर्श आचारसंहिता काळात आतापयर्ंत जिल्ह्यात अवैध मद्य विक्री व साठा केल्याप्रकरणी  49 गुन्हे दाखल केले आहेत़ यातून  2 हजार 200 लीटर विदेशी मद्यासह 2 हजार 600 लीटर हातभट्टीचे रसायन, 1 हजार 400 लीटर गावठी दारु 500 लीटर ताडी, 300 लीटर बियर असा एकूण 30 लाख 28 हजार 559 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन 41 आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हे दाखल करुन अटक केली आह़े 

Web Title: Beer bar seals in Mars market for violating 'Dry Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.