शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

वैयक्तीक हेव्यादाव्यांमुळे नवागाव येथे बचत गटाची मुस्कटदाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 12:49 IST

नंदुरबार : जिल्हास्तरीय समितीकडून रास्तभाव दुकानासाठीची प्राथम्य क्रमानुसार मंजूरी मिळूनही तळोदा येथील देवमोगरा महिला बचत गटास प्रत्येक्ष काम सुरु ...

नंदुरबार : जिल्हास्तरीय समितीकडून रास्तभाव दुकानासाठीची प्राथम्य क्रमानुसार मंजूरी मिळूनही तळोदा येथील देवमोगरा महिला बचत गटास प्रत्येक्ष काम सुरु करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े याकडे संबंधित ग्रामसेवक व अधिका:यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आह़े तळोदा तालुक्यातील नवागाव येथे रास्तभाव दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी धनलक्ष्मी महिला बचतगट, एकविरादेवी महिला बचतगट, ममता महिला बचतगट, आप की जय महिला बचतगट, देवमोगरा महिला बचतगट व सरस्वती महिला बचतगट आदींकडून अर्ज प्राप्त करण्यात आले होत़े त्यानुसार जिल्हास्तरीय समितीकडून प्राथम्य क्रमवारीनुसार देवमोगरा महिला बचतगटास रास्तभाव दुकान मंजूर करण्यासाठी शिफारस केली आह़े परंतु संबंधित गावातील सरपंचांनी विश्वासात न घेता परस्पर पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करुन देवमोगरा बचतगट रास्तभाव दुकान चालविण्यास तयार नसल्याचे सांगून हा परवाना सरस्वती महिला बचत गटाला द्यावा असा दावा केल्याचा आरोप आह़े गावात महिला ग्रामसभा घेऊन त्यानुसार सर्वानुमते महिला बचत गटाची निवड करणे आवश्यक असताना जाणूनबुजून महिला ग्रामसभा घेतली जात नसल्याचा आरोप देवमोगरा महिला बचत गटाकडून होत आह़े याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आदेश पुरवठा अधिका:यांकडून संबंधित ग्रामसेवकांना दिले आह़े तरीदेखील याकडे दुर्लक्ष होत आह़े याबाबत देवमोगरा महिला बचत गटाच्या अध्यक्षा बबीता मोरे व अलका वळवी यांनी रेशन दुकानाचा परवाना आपणास मंजुर असून रेशन दुकान चालविण्यास सक्षम असल्याचा दावा निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाकडे केला आह़े परंतु स्थानिकांच्या वैयक्तीक स्वार्थामुळे हा परवाना मिळू दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आह़े