नंदुरबार : शेतात बैल घुसल्याच्या वादातून सहा जणांनी एकास जबर मारहाण केली. तोंडात लाकडी काठी घालून आणि गळा दाबून ठार मारण्याचा प्रय} केल्याची घटना सरीचा टेंबरीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लटी टेंबरी गव्हाणपाडा येथील मांगला पेचारा वसावे यांचा बैल रमेश चमा:या पाडवी यांच्या शेतात गेला होता. त्यात पिकांचे नुकसान झाल्याचे वाईट वाटून रमेश चमा:या पाडवी व इतरांनी मांगला वसावे यांच्याशी वाद घातला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. सहा जणांनी घेरून त्यांना बेदम मारहाण केली. एकाने लाकडी काठी त्यांच्या तोंडात कोंबून तसेच गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून मांगला वसावे घरी आले. त्यानंतर त्यांनी मोलगी पोलिसात फिर्याद दाखल केली. यावरून मोगीबाई रमेश पाडवी, रमेश चमा:या पाडवी, दिलीप कालश्या पाडवी, दिनकर भारता पाडवी, नारसिंग सारजा वसावे, सारपा मागत्या वसावे सर्व रा.सरी, ता.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध गुनन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राजेंद्र दाभाडे करीत आहे. अद्याप संशयीतांना अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मोलगी येथे शेतात बैल घुसल्याचा वादातून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:15 IST